07:36pm | Jun 08, 2018 |
सातारा : जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ माजविणारा तसेच जिल्हा महसूल विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणार्या तेटली बोगस सातबारा प्रकरणामुळे सातारा महसूल विभागाची राज्यभरात छी थु: झाली आहे. तेटली, ता. जावली येथील शासकीय जमिनीवर डल्ला मारुन त्याचे बोगस सातबारे तयार करुन ती जमीन सातारा येथील एका बड्या बिल्डरच्या घशात घातली होती. परंतू जिल्हा प्रशासनाने तेटली बोगस सातबारा प्रकरणात कसल्याच प्रकारचा 'इंटरेस्ट' न दाखवल्यामुळे सातबारा प्रकरणाचा राक्षस आता जिल्हा प्रशासनाच्या बोकांडी बसलेला आहे.
परवा सातारा येथे बोगस सातबारा प्रकरणी काही लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या स्तरावर जामीन घेण्यासाठी अवैध सातबारे तयार करुन ते सातबारे हजारो रुपयांमध्ये संबंधित गरजूंना दिले जात होते. त्याद्वारे संबंधित न्यायालयातून जामीन मिळवित असे. या प्रकरणी जिल्हा प्रशासन सध्या तरी बॅकफूटवर आलेले आहे. तेटली बोगस सातबारा प्रकरणात जिल्हाधिकार्यांनी स्वत: लक्ष न घालता याबाबत उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्या अधिपत्याखाली समिती गठीत केली होती. मात्र या समितीच्या चिमणीमधून तपासाचा कसलाही धूर अद्यापपर्यंत निघालेला नाही. त्यामुळे वाई, महाबळेश्वर, फलटण, जावली येथे बोगस सातबारा तयार करणार्या रॅकेटचे मनोबल उंचावलेले आहे. तेटली, ता. जावली येथे सर्व्हे न. 102 व 32 क/4 हे अस्तित्वात नसणारे नंबर हे सातार्यातील भू माफिया व महसुलातील काही घरभेद्यांनी संगनमताने तयार केले. त्याचा बोगस सातबारा बनवून तो सातबारा महसूल विभागाच्या सातबारा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आला. त्याद्वारे संबंधित सर्व्हे नंबरचे बोगस दस्तावेज अस्तित्वात आणण्यात आले. या बोगस सातबाराद्वारे शासनाच्या सुमारे 59 गुंठे जमिनीवर म्हणजेच जवळपासू कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर भू माफियांनी डल्ला मारला आहे. यामुळे या प्रकरणाची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली होती. त्यामुळे हे प्रकरण राज्यातील महसूल विभागात चांगलेच चर्चिले जात होते. सातारा टुडे च्या वृत्ताची लिंक महाराष्ट्रातील महसूल मंत्र्यांसह राज्यातील जिल्हाधिकार्यांच्या तसेच महसूल अधिकार्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्यामुळे सातारा महसूल विभागाची राज्यभरात नाचक्की झालेली होती.
या सर्व गोष्टींमुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय चांगलेच चर्चेत आले होते. याबाबत या घटनेच्या अनुषंगाने सातारा टुडे च्या प्रतिनिधींनी सातारा महसूल विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करुन हे संपूर्ण प्रकरण जाणून तसेच उलगडण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या. तेटली प्रकरणातील संशयित आरोपींनी या अगोदरही अनेक शासकीय वनविभागाच्या जमिनीवर बोगस सातबारे बनवून डल्ला मारल्याची शक्यता नाकारता येत नाही. सातारा टुडे ने वाई, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण व सातार्यात बोगस सातबारा बनवून देणारे रॅकेट कार्यरत असल्याचे वारंवार वृत्तांकनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र वाळूच्या नादात महसूल विभागाने सगळंच गमावलं आहे. वाळूतील आर्थिक गणितांमुळे जिल्हा प्रशासनाचे जिल्ह्यातील इतर गंभीर प्रश्नांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे तेटली व सातारा येथील बोगस सातबारा प्रकरणे उघडकीस येत आहेत. जिल्ह्यात येत्या काळात अशाच प्रकारची गंभीर स्वरुपाची प्रकरणे चव्हाट्यावर येणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कंबरेचं काढून डोईला बांधलेलेसुद्धा जागेवर राहणार नाही. 'हमाम मे सब नंगे' अशी अवस्था सध्या जिल्हा प्रशासनाची झाली आहे.
सध्या तेटली बोगस सातबारा प्रकरणाचा तपास सातार्यातील स्थानिक गुन्हे शाखेकडे आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी नितीन भानुदास काळे (वय 34, रा. सैदापूर, ता. जि. सातारा), दिलीप भुवाल सहाणी (वय 27, रा. सैदापूर, सातारा), भरत नामदेव सूर्यवंशी (वय 32 रा. लांडेवाडी, औध, ता. खटाव, जि. सातारा), राहुल आनंद धनावडे (वय 28, रा. विवर, ता. जावली, जि. सातारा), संभाजी रावसाहेब घाटगे (वय 57 रा. सैदापूर, ता. जि. सातारा), सारिका राजेंद्र जाधव (वय 37 रा. आंबवडे खु. ता. जि. सातारा), संतोष काशिनाथ मालुसरे (रा. फुरुस, ता. जावली), एकनाथ देवजी मालुसरे (रा. केळघर तर्फ सोळशी, ता. जावली) यांना अटक केली होती. यातील सर्व संशयित सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र, तेटली बोगस सातबारा प्रकरणाचा तपास सध्या थंडावलेला आहे. यातील बडी धेंडे अद्याप खुलेआम वावरत आहेत. जिल्हा प्रशासनालाही या प्रकरणात प्रथमपासूनच 'इंटरेस्ट' नसल्यामुळे यातील बडी धेंडे मोकाट आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणात खोलात जावून तपास करावा लागणार आहे. तपास केल्यानंतरच याची व्याप्ती किती मोठी आहे, हे लक्षात येणार आहे. मेढा तहसिलदारांची भूमिका या प्रकरणात प्रथमपासूनच संशयास्पद असल्याचे वार्तांकन सातारा टुडे ने वेळोवेळी केले आहे. मात्र जिल्हाधिकारी सातारा यांनी मेढा तहसिलदार यांना पाठिशी घालण्याचे काम केले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सध्या बोगस ऑनलाईन सातबार्याचा सुळसुळाट झाला आहे.
बोगस सातबारा प्रकरणातील ‘त्या’ बिल्डरला अभय कोणाचे?
तेटली, ता. जावली येथील ऑनलाईन बोगस सातबारा प्रकरणात सातारा येथील एका नामांकित बिल्डरचे नाव आले होते. मेढा तहसिलदार यांनी बोगस सातबारा प्रकरणी संबंधित बिल्डरच्या कुटूंबियांच्या विरोधात मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र चोरांना फाशी व दरोडेखोरांना 'क्लिनचिट' या प्रमाणे या प्रकरणात प्याद्यांना फासावर देवून तहसिलदारांसह बिल्डरच्या कुटूंबाला मात्र क्लिनचिट दिल्यामुळे यामध्ये मोठी आर्थिक 'तोड' झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या बिल्डरासह तहसिलदारांना अभय कोणाचे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |