सातारा : वाळू वाहतुकीसाठी अडथळा न करता व वाळू वाहतुकीसाठी तो ट्रॅक्टर तसाच चालू ठेवण्यासाठी दरमहा ७ हजार रुपयांचा हप्ता मागितल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या बरड पोलिस चौकीचा पोलिस हवालदार अतुल सदाशिव सोनटक्के (वय ४७, रा.जाधववाडी ता.फलटण) या पोलिसाविरुध्द लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी या पोलिसाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सातारा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, याप्रकरणातील तक्रारदार यांचा ट्रॅक्टर असून तो वाळूसाठी वापरला जातो. या वाळू वाहतुकीसाठी व अडथळा न करण्यासाठी सपोनि बुरसे व पोलिस हवालदार सोनटक्के यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणीचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी दि. ५ फेब्रुवारी रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात केला. पुणे कार्यालयात हा तक्रारअर्ज आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक कांचन जाधव यांच्याकडे तो तपासासाठी देण्यात आला.
सातारा पोलिस दलातील फलटण पोलिसांविरुध्द पुणे एसीबीला लाचेप्रकरणी तक्रारअर्ज आल्यानंतर दुसर्याच दिवशी त्याबाबत पडताळणी केली असता ट्रॅक्टरला वाळू वाहतुक करण्यासाठी पोलिस हवालदार अतुल सोनटक्के यांनी ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. लाचेच्या रकमेची मागणी झाल्यानंतर पोलिस ती लाच कधी व केव्हा घेणार? यासाठी वाट पाहत होते. मात्र पोलिसाने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. लाचेची रक्कम स्वीकारली जात नसल्याने अखेर दि. ९ एप्रिल रोजी संशयित पोलिस अतुल सोनटक्के यांच्याविरुध्द लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
लाचेच्या मागणीप्रकरणी फलटण पोलिसाला अटक झाल्यानंतर फलटणसह सातारा पोलिस दलात खळबळ उडाली. तक्रारदार यांनी पुणे येथील एसीबीशी संपर्क साधल्याने त्याबाबतही कौतुक होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सातारा लाचलुचप प्रतिबंध विभाग करणार आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात शासकीय कार्यालयात कुठेही लाचेची मागणी झाल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |