सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून यामध्ये सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर यांची शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये बदली झाली आहे. दरम्यान, पोलिस ठाण्याचे कारभारी तडकाफडकी बदलल्याने पोलिस दलात जोरदार चर्चा सुरु आहे.
शहर पोलिस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर यांनी एक वर्षापूर्वी कार्यभार हाती घेतला होता. एका वर्षातच त्यांची शहरमधून उचलबांगडी करुन शाहूपुरी पोलिस ठाण्याचा चार्ज देण्यात आला आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोनि किशोर धुमाळ यांची जिल्हा वाहतुक शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हा शाखेचे पोनि एस.बी.गायकवाड यांची शहर पोलिस ठाण्यामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
पोनि एस.बी. गायकवाड हे तीन महिन्यांपूर्वी सातारा पोलिस दलात रुजू झाले आहेत. त्याअगोदर ते कोल्हापूर येथे पोलिस निरीक्षक म्हणून होते. पोलिस दलातील झालेल्या या सर्व बदल्या जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी केल्या असून त्याबाबतचा आदेशही काढण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस दलाअंतर्गत या बदल्या झाल्या असल्याचे मुख्यालयातून सांगण्यात आले आहे. दरम्यान, अचानक पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाल्याने पोलिस दलात त्याबाबत खळबळ उडाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |