11:46pm | Aug 28, 2018 |
कराड : चिकुन गुनिया या आजाराच्या साथीने रेठरे बुद्रुक, ता. कराड या गावाला विळख्यात घेतले असताना चिकुन गुनियाचा एक तर डेग्यूचे दोन रूग्ण अढळून आले आहेत. यात ७५ वर्षीय रूग्णासह १५ वर्षीय मुलीचा यात सहभाग असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मैथिली मिरजे यांनी सांगितले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राने तातडीने दहा टीम तयार करून सव्र्हेचे काम हाती घेतले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी तातडीने रेठऱ्याला भेट देऊन पाहणी केली. ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रात बैठक घेऊन स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना दिल्या. ग्रामपंचायतीने गावात स्वच्छतेचे काम हाती घेतले असून सातत्याने फॉगींग मशीनच्या सहाय्याने धुराची फवारणी सुरू आहे. तर बुधवार दि. २९ रोजी तातडीची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे.
वीस हजाराहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या रेठरे बुद्रुक गावात जुलै महिन्यापासून ग्रामस्थांना चिकुण गुनिया सदृष्य साथीच्या आजाराची लक्षणे दिसत होती. शेकडोहून अधिक ग्रामस्थांना ताप, सांधेदुखी, उलटी मळमळ आदी त्रास होत होते. अनेक रूग्णांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार घेतले. मात्र, त्याचा फायदा न झाल्याने खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यास सुरूवात केली.
जिल्हा हिवताप विभागाच्या पथकाने सोमवारी पाच रूग्णंाच्या रक्ताचे नमुने रक्ताचे नमुने तातडीने पुणे येथील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच येथील कृष्णा हॉस्पीटलमध्ये यापूर्वी तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या ७५ वर्षीय रूग्णाचे रक्त नमुन्यात चिकुन गुनियासह डेंग्यूची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. तर १५ वर्षीय मुलीची डेग्यु टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती येथील आरोग्य आधिकाऱ्यांनी दिली.
मंगळवारी गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी रेठरे गावची पाहणी केली. गावातील काही भागातील स्वच्छता तातडीने करण्याच्या सुचना केल्या. सुका व ओला कचरा वेगवेगळा करण्यासह गावात फॉगींग मशीनचा वापर सातत्याने करण्याच्या सुचना ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत दिल्या. यावेळी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य केद्रालाही त्यांनी भेट देऊन आरोग्य केंद्राच्या कामाची सविस्तर माहिती घेतली. तसेच गावातील आरोग्य विषयक परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहण्याच्या सुचना आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
सतर्क राहण्याचे आवाहन
रेठरे बुद्रुक येथील सांडपाणी व कचरा निर्मुलनाबाबत ग्रामपंचायतीला सक्त सुचना देत जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा तातडीने बोलवण्यात यावी असे सुचित करण्यात आले आहे. चिकुन गुनिया व अन्य साथीच्या आजाराशी संबंधित रूग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रेठरे बुद्रुकच्या ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच त्रास होणाऱ्या रूग्णांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
- आबासाहेब पवार, गटविकास अधिकारी, कराड
साथीच्या आजाराला कोण जबाबदार
रेठरे बुद्रुक येथे चिकुन गुनिया, डेग्यू सदृश्य साथीच्या आजाराचा प्रार्दुभाव झाला आहे. याची कल्पना वारंवार प्रा.आ. केंद्राने ग्रामपंचायतीला दिली आहे. उपाययोजनांबाबत सुचनाही केल्या होत्या. या बाबतचा तसा पत्रव्यवहारही केल्याचे प्रा.आ. केंद्राने हिवताप पथक व गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सुचनांचे तंतोतंत पालन केले असतेतर या साथीच्या आजाराला सामोरे जाण्याची वेळच ग्रामस्थांवर आली नसती. त्यामुळे भयानक साथीच्या आजाराला कोण जबाबदार असा प्रश्न यामुळे निर्माण झाली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |