कराड : कराड तालुक्यातील रिसवड या छोट्याशा गावातील लहानपणी एका वर्गात शिकलेल्या आपल्याच सहकार्यांचा एक आगळावेगळा सत्कार सोहळा घडवून आणला आणि देशप्रेम, मित्रप्रेम आणि आपुलकीचे दर्शन घडविले. या भारावलेल्या सोहळ्यामुळे गावातील आजी माजी सैनिकांसह गावकरीही भारावून गेले होते.
रिसवड हे कराड तालुक्यातील एक छोटेसे गाव, या गावाने आजवर अनेक राजकीय, सामाजिक कार्यक्रम घडविले व पाहिले होते. पण आजचा हा कार्यक्रम खरोखरच डोळ्याचे पारणे फेडण्यासारखाच होता. निमित्त होते गावातील आजी माजी सैनिकांच्या सत्कार सोहळ्याचे. स्वत:च्या घरादाराचा विचार न करता केवळ देशसेवेसाठी आपले आयुष्य वेचणार्या एकाच वर्गात शिकलेल्या व पुढे सैन्यदलात भरती झालेल्या प्रकाश इंगवले, संतोष इंगवले, शिवदास जाधव, जमीर मुल्ला, नितीन इंगवले या पाच मित्रांचा त्याच वर्गातील इतर मित्रांनी हे जवान सेनेतून निवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार सोहळ्याचे क्लासमेंट ग्रुप व जगदंब ग्रुप यांनी आयोजन केले होते.
सत्कार समारंभापूर्वी या जवानांची ओपन जीपमधून रिसवडमधून संवाद्य अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत गावकरी, महिला, अबालवृध्द सहभागी झाले होते. गावातील सैन्यदलात असणारे माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय या मिरवणूकीत सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या मनामधील देशप्रेमाची भावना यानिमित्ताने उजळून निघत होती.
या कार्यक्रमात या दोन्ही ग्रुपच्या वतीने प्रकाश इंगवले, संतोष इंगवले, शिवदास जाधव, जमीर मुल्ला, नितीन इंगवले या माजी सैनिकांचा तसेच गावातील सध्या सैन्य दलात कार्यरत असणारे आजी सैनिक मारूती शिवाजी इंगवले, अमोल इंगवले, विशाल कांबळे, योगेश इंगवले यांच्यासह गावातील अन्य माजी सैनिकांचाही सत्कार करण्यात आला.
प्रारंभी डॉ.बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सातारा जिल्हा हा देशप्रेमाने भारलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याने जसे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिले आहे तसेच योगदान सैन्यदलात भरती झालेल्या सैनिकांनी दिले आहे. त्यामुळे समाजाने या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपल्या घरातील पुढची पिढी घडवताना त्यांच्या मनावर संस्काराचे बीज लावले पाहिजे तरच आपला देश हा जगात सर्वश्रेष्ठ ठरेल.यावेळी प्रकाश इंगवले, संतोष इंगवले, शिवदास जाधव, जमीर मुल्ला, नितीन इंगवले, सुनिल कदम व शशिकांत गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर इंगवले, रामराव दाभाडे, प्रकाश भणगे, संदीप सुतार, बंडा चंदुगडे, अमोल चव्हाण, अंकूश इंगवले, विलास इंगवले, आबा झंजे, अमोल इंगवले, भीमराव दाभाडे, विजय इंगवले, महादेव सुतार, विजूभाऊ विनोद चंदुगडे, उमेश काटकर, बापू जाधव, सुनिल इंगवले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बसवेश्वर चेणगे यांनी केले. शेवटी रामराव दाभाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |