सातारा : युवतीचा आकस्मित मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृत्यूबद्दल विमा कंपनीद्वारे २ लाख ३० हजार रुपये मिळवून देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी पंकज मोहन यादव (वय २६, रा.सासपडे ता.सातारा) या युवकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बोरगाव पोलिसांकडून ही मदत मिळवून देत असल्याचे संशयिताने म्हटले आहे.
बाळू व्यंकट लोहार (वय ५२, रा.सासपडे) यांनी याबाबतची बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांना स्नेहल नावाची मुलगी होती. जानेवारी महिन्यात स्नेहलला चक्कर आल्याने तिचा मृत्यू झाला होता. स्नेहलच्या मृत्यूची घटना समजल्यानंतर गावातील अनेक लोक बाळू लोहार यांना भेटले व सांत्वन केले. यावेळी पंकज यादव हा युवकही त्यांना भेटला व व स्नेहलचा आकस्मित मृत्यू झाल्याने त्याबदल्यात २ लाख ३० हजार रुपयांचा चेक (धनादेश) मिळवून देतो, असे सांगितले.
संशयित पंकज यादव याने चेक मिळण्यासाठी बोरगाव पोलिसांनी सांगून तेथील सर्व प्रक्रिया पार पाडून देतो असेही तक्रारदार यांना सांगितले. लोहार कुटुंबियांनाही पंकज बोलतोय त्याच्यावर विश्वास ठेवला. यासाठी संशयित पंकज याने वेळोवेळी तक्रारदार यांच्याकडून ५८ हजार रुपये घेतले. संशयिताने चेक मिळण्यासाठी बँकेत खाते काढायला लावून तसेच दरम्यानच्या काळात चेक मिळाला असल्याचे सांगून त्याने बँकेत प्रक्रिया केली असल्याचे खोटी काही कागदपत्रेही दाखवली. मात्र गेल्या काही दिवसांपासून संशयित पंकज हा तक्रारदार यांना भेटण्यास टाळाटाळ करत होता. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तक्रारदार यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात जावून घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयित पंकज याच्याविरुध्द यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |