सातारा : सातारा शहर परिसरासह तालुक्यात बेकायदा दारुविक्री करणारे अड्डे पोलिसांनी उध्वस्त करत १० जणांवर गुन्हे दाखल करुन तब्बल ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. छाप्यामध्ये पोलिसांनी सुमारे २३० दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे मटका, जुगार बहाद्दरांप्रमाणे बेकायदा दारुविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अक्षय बबन किर्तीकुडाव, प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव (दोघे रा.कोडोली), नवनाथ मिरगे (रा.कोडोली), जयसिंग कांबळे (रा.प्रतापसिंहनगर), चंदन माणिकराव वाघ (रा.चाहूर), चेतन प्रदीप सोळंखी (रा.सदरबझार), नारायण दत्तात्रय पवार (रा.धावडशी), मुनिफ राजकिशोर शर्मा, अल्ताफ जमाल पठाण, अस्लम जमाल पठाण (तिघे रा.जवळवाडी ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरातील कोडोली, दत्तनगर, रहिमतपूर रोड, धावडशी, जवळवाडी येथे बेकायदा दारुविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी दिवसभारात व रात्री पोलिसांनी याठिकाणी विविध पोलिसांच्या पथकाद्वारे छापासत्र राबवले. पोलिसांनी छापा टाकला असता घटनास्थळावरुन पोलिसांना २३० दारुच्या बाटल्या, रोख रक्कम व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी हे छापासत्र राबवल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. हे सर्व अड्डे घराशेजारी आडोशाला, गावच्या कमानी परिसरात, आडबाजूला सुरु होते. पोलिसांनी छापा टाकल्याचे लक्षात येताच अनेकांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केल्याने गोंधळ उडाला होता. तसेच सध्या अनेक ठिकाणी यात्रा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई केल्याने दारु विक्रेत्या व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सातारा शहर व तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |