02:15am | Dec 27, 2019 |
खंडाळा : खंडाळा पोलीस स्टेशनअंतर्गत असणा-या एका गावामधील विवाहित महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करीत फोटो व्हाँटसअँपवर स्टेटस ठेवत प्रसारित केल्याबद्दल खंडाळा पोलीसांनी अमोल लक्ष्मण फणसे (वय २८) या युवकाला जेरबंद केले आहे. फणसे याला खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतच्या पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विवाहितेबरोबर अमोल फणसे याने जुलै २०१९ पासून आजतागायत प्रेमसंबंध निर्माण करीत पिडित विवाहित महिलेस मला तुझी खूप आठवण येते , तुझ्या मोबाईलमध्ये असलेले फोटो मला पाठव असे म्हणत विवाहित महिलेने फोटो पाठवायला नकार दिला असता अमोल फणसे याने मला फोटो पाठविणार नसशील तर आजचे आज माझे तुझ्याकडे असलेले माझे उसने पैसे मला परत कर, असे म्हणून विवाहितेला फोटो पाठवायला लावले. त्यानंतर अमोल फणसे याने विवाहितेला मुंबई याठिकाणी भेटण्याकरिता बोलावल्यानंतर विवाहितेने मुंबईला यायला नकार दिला असता अमोल फणसे याने माझे तुझ्याकडे असलेले ३ लाख २५ हजार रुपये मला परत कर नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल अशी तंबी विवाहितेला दिली. त्यानंतर अमोल फणसे याने ऑगस्ट २०१९ मध्ये स्वतःच्या सोशल मिडीयाच्या स्टेटसला विवाहितेचे फोटो ठेवत व्हायरल करत विवाहितेची बदनामी केल्याप्रकरणी विवाहितेने या गोष्टीला कंटाळून खंडाळा पोलीस स्टेशनला धाव घेतली. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल फणसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल फणसे याला खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस हवालदार प्रशांत धुमाळ, गिरीश भोईटे, सचिन वीर यांच्या पथकाने सापळा रचत त्याला अटक केली आहे. अमोल फणसे याला खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे करीत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस हवालदार सचिन वीर, प्रशांत धुमाळ, गिरीश भोईटे हे सहकार्य करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |