कराड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याबरोबरच केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचली आहेत. त्यामुळेच पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीचेच सरकार सत्तेमध्ये येणार आहे. भाजप सरकारची ही विकासाची दृष्टी पाहून दक्षिणच्या जनतेने आता परिवर्तन घडविण्याचा निर्णय घेतला आहे, हे असे प्रतिपादन भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यंानी केले.
कालवडे (ता.कराड) येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन काशिद, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, विवेक पाटील, डॉ. सारिका गावडे, व्ही.के. मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून राज्यात सिंचन, कृषी, आरोग्य, रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना राबविल्या आहेत. येत्या काळात विकासाची ही गंगा कराड दक्षिणमध्ये गतिमान करण्यासाठी भाजपाला साथ द्यावी.
मदनराव मोहिते म्हणाले, अतुलबाबांनी गेल्या 5 वर्षामध्ये दक्षिण मतदारसंघात केलेले कार्य लक्ष वेधून घेणारे आहे. सत्तापद नसताना त्यांनी एवढा निधी आणला; आमदार झाल्यावर याच्या पाचपट निधी ते भाजप सरकारच्या माध्यमातून आणतील. त्यामुळे यावेळी सर्वांनी मिळून अतुलबाबांना आमदार करूया, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |