02:31pm | May 16, 2018 |
फलटण : आज पहाटे फलटण शहर पोलिसांनी मंगळवार पेठे लगत असणाऱ्या कुरेशी नगरात छापा मारून सुमारे शंभर पेक्षा जास्त गाईंची कत्तल केलेले मास तसेच जिवंत एकवीस जनावरे ताब्यात घेतली आहेत. तसेच एकास पोलिसांनी अटक केेली.
राज्यात सध्या गोवंश हत्या बंद आहे. असे असतानाही फलटणमध्ये कुरेशी नगरात अनधिकृतपणे जुन्या कत्तलखान्यात गाई आणि तत्सम जनावरांची कत्तल चालू असल्याची माहिती मुंबई येथील मानद पशु कल्याण अधिकारी येतेंद्र कांतीलाल जैन यांनी फलटण पोलिसांना दिली. त्यानुसार फलटण शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण पोलीस ठाण्यातील सपोनि. शिंगटे, दळवी व कर्मचाऱ्यांनी आज पहाटे पावणे एकच्या सुमारास येथील कुरेशनगरात जुन्या कत्तलखाण्यावर छापा टाकला. यावेळी गोवंशाची कत्तल करण्यात आलेली सुमारे शंभर मुंडकी व मास या ठिकाणी मिळून आली. तसेच जनावरांची कत्तल करणारे दोघे पोलीसांनी छापा टाकल्याचे लक्षात आल्यानंतर त्याठिकाणाहून धारधार शास्त्रासह अंधारातून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संबंधित संशयितांची पाठलाग करून इम्तियाज मेहबूब बेपरी याला ताब्यात घेतले.
राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही गेल्या बऱ्याच वर्षांपासून हा उद्योग फलटणमधील कुरेशी नगरात बिनदिक्कतपणे फलटणच्या राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने सुरू होता. फलटणमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रारी सुद्धा केल्या होत्या. दरम्यान मुंबई येथील येतेंद्र जैन यांच्या सुचनेमुळे फलटण पोलिसांनी छाप मारल्यामुळे फलटण शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.
संबंधित जागेवरून पोलिसांनी सुमारे २१ जिवंत जनावरे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणातील एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून बाकी संशयितांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सावंत करीत आहेत.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |