कराड : चहाच्या टपऱ्या का बंद केला? अशी विचारणा करत हिस्ट्रीशिटरने पोलिसाच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये डोळ्याला व कपाळावर गंभीर जखमी होऊन पोलीस रक्तबंबाळ झाला. गुरुवार दिनांक 1 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी हिस्ट्रीशीटरला अटक केली आहे.
अनिल नारायण गायकवाड (रा. बुधवार पेठ, कराड) असे पोलिसाला दगडाने मारहाण करणाऱ्या संशयित हिस्ट्रीशिटरचे नाव आहे. तर सागर संजय काटे (वय 30) असे जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सागर काटे व खाडे हे दोघेजण गुरुवारी रात्री कराड बसस्थानक परिसरात ड्युटी बजावत होते. यावेळी ते बस स्थानक परिसरातील चहाच्या टपऱ्या बंद करून नवग्रह मंदिरासमोर उभा होते. त्यावेळी तेथे अनिल गायकवाड आला. त्याने सागर काटे याला चहाच्या टपर्या बंद का केला ? तु मला ओळखतो का? माझ्यावरही पाच - सहा गुन्हे दाखल आहेत, असे म्हणून लागला. त्यावेळी सागर काटे यांनी मी तुला ओळखतो तु हिस्ट्रीशिटर आहेस येथून जा, असे सांगितले. त्यानंतर अनिल गायकवाड तेथून जात असताना तो सागर काटे यांना शिवीगाळ करू लागला. तसेच काही अंतरावर गेल्यानंतर अनिल गायकवाड यांने दगड उचलून संजय काटे यांना फेकून मारला. तो दगड काटे यांच्या डोळ्यावर व कपाळावर लागल्याने रक्तबंबाळ झाले. यावेळी काटे यांच्याबरोबर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचारी खाडे यांनी अनिल गायकवाड याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधाराचा फायदा घेऊन तो बस स्थानकाच्या दिशेने पळून गेला. त्यानंतर खाडे यांनी जखमी सागर काटे यांना उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी संशयित अनिल गायकवाड याला अटक केली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |