04:07pm | Feb 10, 2020 |
नवी दिल्ली : अनुसूचित जाती, जमातींविरोधी अत्याचाराला प्रतिबंधक करणाऱ्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या कायद्यातील सुधारणांना सुप्रीम कोर्टाने मंजुरी देत या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करण्याची तरतूद कायम राहणार असून कोणत्याही व्यक्तीला या कायद्यांतर्गत अंतरिम जामीन मिळणार नाही, असे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे अत्याचार पीडितांसह केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायाधीश विनीत शरण आणि न्यायाधीश रवींद्र भट्ट यांच्या खंडपीठाने एससी एसटी सुधारणा कायद्याला मंजुरी दिली. या कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावताना सुप्रीम कोर्टाने या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करणे आणि अंतरिम जामीन नाकारणे या तरतुदी कायम राखल्या आहेत. केंद्र सरकारने एससी-एसटी कायद्यात सुधारणा करत एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला अंतरिम जामीन देण्यावर प्रतिबंध केला आहे.
२० मार्च २०१८ ला सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्यातील एखाद्या आरोपीला अटक करण्याबाबतच्या तरतुदी काहीशा शिथील केल्या होत्या. तसेच, या कायद्यांतर्गत आरोपीला अंतरिम जामीन देण्याचीही तरतूद केली होती. या कायद्यानुसार, एखाद्या सरकारी कर्मचारी अथवा अधिकाऱ्यावर कारवाई करताना त्याच्या अटकेपूर्वी संबंधित विभागाची अनुमती घेणे आवश्यक असल्याचीही या कायद्यात तरतूद करण्यात आली होती. याबरोबच सर्वसामान्य व्यक्तीवर या कायद्यांतर्गत आरोप असल्यास एसएसपींच्या स्तरावर पोलीस अधिकाऱ्याची अनुमती घेणे आवश्यक होते. शिवाय एफआयआर दाखल करण्यापूर्वी त्या प्रकरणातील प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे अशीही पूर्वीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली होती.
सरकारने बदलला सुप्रीम कोर्टाचा निर्णय
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारने संसदेत या कायद्यात सुधारणा केल्या आणि मूळ तरतुदी पुन्हा आणल्या. याच बदलाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. या प्रकरणावरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या कायद्यातील तरतुदी शिथील करण्याचा निर्णय मागे घेतला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |