02:57pm | Oct 12, 2019 |
बिजवडी : माण खटाव मतदारसंघात निस्वार्थी भावनेने समाज हित जपत लोकसेवा केल्यामुळे माण खटावची जनता आपल्याबरोबर आहे.या सर्वसामान्य जनतेचा मी उमेदवार असलो तरी आता जनतेनेच हि निवडणूक हाती घेऊन परिवर्तनाची हाक दिली आहे. त्यामुळे मतदारसंघातील सुज्ञ जनता यावेळी मला मतांच्या रुपाने नक्की आशीर्वाद देवून विधानसभेत पाठवील असा ठाम विश्वास शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शेखरभाऊ गोरे यांनी केले आहे.
शिवसेना व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शेखरभाऊ गोरे दहिवडी येथे मतदारांच्या भेटी प्रसंगी बोलत होते.
शेखरभाऊ गोरे म्हणाले, माण खटाव विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, शेतकरी राजा व सामान्य नागरीक परिवर्तनासाठी हि निवडणूक हाती घेऊन रस्त्यावर उतरला आहे.विरोधकांनी १० वर्षात माण खटावच्या मतदाराला व शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम दिले असते तर पोटासाठी घरदार गाव सोडून जगण्यासाठी व काम धंद्यासाठी जाणार्याची संख्या कमी झाली असती. पण आजही तालुक्यातील जनतेला जगण्यासाठी स्थलांतर करावे लागते. शेतकऱ्यांना, बेरोजगार युवकांना फसवण्याचे पाप दहा वर्षात करणाऱ्याला घरी बसवण्यासाठी माझी उमेदवारी आहे. माझा एकच अँजेंडा घेऊन रणांगणात उतरलो आहे तो म्हणजे शेतीला व पिण्याला पाणी, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग आणणे, प्रशस्त दवाखाने, उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
तसेच माण खटाव तालुक्याला लागलेला दुष्काळी कलंक पूसून येथील शेतकर्याला जिवन सुखकर करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून उरमोडी, जिहे कठापुर,टेंभू या विविध प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत कायमस्वरूपी पोहचवणारच. दहा वर्षे आमदार म्हणून राहिलेल्या माजी आमदारांनी फक्त दुसऱ्यानी मंजुर करुन आणलेल्या कामाचे नारळ फोडण्यात धन्यता मानत चमकोगिरी करण्यात विकास कामा पेक्षा चमकोगिरी करण्यातच धन्यता मानली आहे. माजी मुख्यमंत्र्यांना दरमहिन्याला माण खटाव मध्ये हिल स्टेशनला फिरवल्या प्रमाणे फिरवून मतदारसंघातील जनतेचा किती साधला हि जनता उघड्या डोळ्यानी पाहत आहे. ते पुढे म्हणाले माझ्याकडे कोणती हि सत्ता नसताना मंत्र्याचे फंड नसताना स्वखर्चातुन ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाई गावांना पाणी विकत घेऊन टँकरने माणसांना व जनावरांना पाणी दिले .अत्यावस्थेत असलेल्या रुग्णांना मोफत अँम्बुलनस सेवा पुरवली ,दरवर्षी एक हजार शालेय विद्यार्थ्यांची लाखो रुपये फि भरली, पाणी फांऊंडेशनच्या कामाला जेसीबी ,पोकलेन डिझेल भरुन मोफत देवून हजारो एकर क्षेत्रावर पाणी साठवण्यासाठी जलसंधारणाची कामांना मदत केली.अनेक गावात तरुणांना व्यायामाची सवय लागुन युवक सशक्त केले, स्वखर्चातुन अनेक ठिकाणी रस्ते केले, गरजुना मदतीचा हात, तर आजारी असणाऱ्याना उपचारासाठी निस्वार्थी भावनेने मदत केली आहे.
हे समाजकार्य करण्यासाठी मला अजून बळ देण्यासाठी सर्वांनी २१ तारखेला धनुष्यबाणाचे चिन्हासमोरचे बटण दाबून मला विक्रमी मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अनेक शेतकरी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
त्यांची मतांच्या रूपाने फसवणूक करावी...
माजी लोकप्रतिनीधी दहा वर्षापासून पाणी आणल्याचे नाटक करुन माणखटाच्या भोळ्याभाबड्या जनतेची फसवणुक करत आहेत.बेरोजगार युवकांच्या हाताला काम देतो म्हणणाऱ्यांनी एकही उद्योगधंदा आणला नाही. शेतकऱ्यांबरोबरच युवकांची फसवणूक करणाऱ्या माजी लोकप्रतिनीधींची जनतेने मतांच्या रुपाने फसवणूक करुन त्यांना घरी बसवावे.
विक्रमी मतदान देण्याचा दहिवडीकरांचा निर्धार...
माण मतदारसंघातील दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण असून या शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व दहिवडी शहर रोलमॉडेल बनवण्यासाठी नागरीकांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शेखरभाऊ गोरेंना विक्रमी मतदान करण्याचा निर्धार केला असून त्यांच्या गाठीभेटींना उत्सफूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |