RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

भांडणातून आणि संघर्षातून कोणाचाच विकास होत नाही : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

16 April 2019 at 01:58

शेंद्रे : आजवर पार्टी व गट म्हणून आपण प्रत्येक जण भांडलो, मात्र ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू शकत नाही. मात्र नव्याने संघर्ष वाढू नये म्हणून म्हणून आता नवे पर्व सुरू केले आहे. भांडणातून आणि संघर्षातून कोणाचाच विकास होत नाही आणि काहीही साध्य होत नाही. तुम्ही जनता नीट राहावी आणि शिवछत्रपतींच्या घराण्याचे वलय आपापसातील वादामुळे मलिन होऊ नये, म्हणून हा संघर्ष थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला. कार्यकर्त्यांनीही गुण्या गोविंदाने राहावे व एकत्रित प्रयत्न करून उदयनराजेंना प्रचंड मतांनी विजयी करूया असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी, काँग्रेस, आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोनगाव ता. सातारा येथे आयोजित शेंद्रे व परळी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीच्या माहिती व तंत्रज्ञान सेलचे सारंग पाटील, माजी सभापती सुनील काटकर, बाजार समितीचे माजी सभापती राजू भोसले, बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम पवार, जितेंद्र सावंत,  अरविंद चव्हाण,  जि. प. सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, सौ. कमल जाधव, सौ. वनिता पोतेकर, प्रकाश जाधव, भिकूभाऊ भोसले, हणमंत गुरव,  रुपाली जाधव, छाया कुंभार, सूर्यकांत पडवळ,  संजय पोतेकर,  अॅड. अंकुश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

उरमोडीचे धरण झालं आता कॅनॉल झाले पाहिजे. कारण कॅनॉलमुळेच हरित क्रांती घडेल. मात्र त्यासाठी काँग्रेस प्रणित महाआघाडीचे सरकार अस्तित्वात यायला हवे, असे आवाहन करून आमदार शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले की, आजचे केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. शेती व शेतकरी जिवंत ठेवायचा असेल आणि कृषिप्रधान भारत ही ओळख कायम ठेवायची असेल, तर या निवडणुकीकडे योग्य नजरेने जनतेने पहावे. हे जनतेचे कर्तव्यच आहे. सर्व काही टिकवायचं असेल तर दोन्ही काँग्रेसच्या पाठीशी रहा. सध्या देशातील कोणताही घटक सरकारच्या कारभारावर खुश नाही. बळीराजा अगोदरच अडचणीत आला आहे. सर्वधिक रोजगार निर्मिती करणारे बांधकाम क्षेत्र जीएसटी, नोटबंदी आणि रेरासारख्या चुकीच्या निर्णयामुळे कोलमडले आहे. नोटबंदीच्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांची आणि जिल्ह्याची अर्थवहीनी असणारी जिल्हा मध्यवर्ती बँकही अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. अर्थात सर्व निकषांना सामोरे जात आम्ही आमचे नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र देशात हुकुमशाहीचे अवडंबर माजू द्यायचे नसेल तर सध्याचे सरकार हटवा.

खा. उदयनराजे म्हणाले की, निवडणुकीची निम्म्याहून अधिक लढाई नियोजनावर अवलंबून असते. सर्व बूथ कमिटी सदस्य सक्रिय झाल्याने केवळ माझाच आत्मविश्वास वाढला, असे नाहीतर विधानसभेच्या आगामी निवडणुकीतून शिवेंद्रसिंहराजे हेच पुन्हा आमदार असतील, हे सिद्ध झाले आहे. बूथ कमिटी हा कोणत्याही निवडणुकीचा कणा असतो. सारंग पाटील यांनी या कमिटीच्या आधाराने अचूक नियोजन केल्याने आपले मताधिक्य वाढेल. याशिवाय पदवीधर मतदरसंघातील आगामी आमदार म्हणूनही सारंग पाटील खंबीरपणे निवडून येतील. माझा तीन दशकांचा सार्वजनिक जीवनातील अनुभव लक्षात घेता विधानसभेतील सिनियारिटीमुळे शिवेंद्रराजेच निश्चित मंत्री असतील, अशी माझी खात्री आहे

ज्यांनी जनतेची दिशाभूल केली. केसाने गळा कापला आणि जे सर्वसामान्यांवर रुबाब दाखवतात त्यांना धडा शिकवणारे खणखणीत नाणं आम्ही आहोत. हे नाणं ओरिगनल आहे. शोले सिनेमातल्यासारखे बनावट नाही. त्यामुळे जनता आमचाच विचार करेल, अशी आम्हास खात्री आहे.

राजू भोसले म्हणाले की, संपूर्ण देशाला दिशा देणारी ही निवडणुक असून सातारा तालुक्यात या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये दोन्ही महाराजांच्या विचारांचे ४२  हजारांहून अधिक मतदान आहे. मनोमिलनाचा पॅटर्न साकारल्याने दुसऱ्या कोणत्या पक्षाचा बूथही लागणार नाही, इतकी तयारी कार्यकर्त्यांनी करावी.

सुनील काटकर म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला संघर्ष नको आहे. दोन्ही महाराज हाच सातारा तालुक्यामधील पक्ष आहे. त्याव्यातरिक्त कोणीही नाही, त्यामुळे उदयनराजेंना सातारा तालुक्यातून संपूर्ण मतदान होईल.

यावेळी विक्रम पवार,  प्राध्यापक डॉ शिवाजीराव चव्हाण, सौ विद्या देवरे, बचाराम यादव, सोमनाथ गोडसे, अरविंद चव्हाण, जितेंद्र सावंत, उत्तमराव नावडकर, सुरेश पडवळ आदींचीही भाषणे झाली.

य सभेस  हणमंतराव देवरे, आबासाहेब साळुंखे तसेच परळी व शेंद्रे गटातील प्रमुख कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समज- गैरसमज आणि जिरवजिरवीच्या राजकारणामुळे आजवर तालुक्यात काही नको त्या गोष्टी घडल्या. मात्र अता आमचं जमलं असून जेव्हा पुढे जायचे असते, त्यावेळी बऱ्याच गोष्टींना फाटा द्यायचा असतो. म्हणूनच आजचा मेळावा फाट्यावरील मंगल कार्यालयात घेतला आहे, असे उदयनराजेंनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट केला.

व्यक्तिशः मला कोणाबद्दलही आकस नाही आणि ठेवायची गरजही नाही. त्यामुळे व्यापक दृष्टिकोन पत्करल्याशिवाय प्रगतीही होत नाही. आता तालुक्याच्या राजकारणात सुनील काटकर व राजू भोसले ही नवी मित्रत्वाची जोडगोळी उदयास येत आहे. मनोमिलनच्या या रोपट्याला कार्यकर्ते व जनतेने खंबीर साथ द्यावी. आज फार नाही, मात्र २० तारखेच्या सभेत मी ना भूतो न भविष्यती असे मनोगत व्यक्त करेन, असेही उदयनराजे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. 

एका दिवसात वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर ७ मुलाखती प्रसारित होण्याचा आणि त्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद हा माझ्या नावावरील नवा विक्रम आहे, असे सांगून उदयनराजे म्हणाले की, गेल्या निवडणुकीत जनतेच्या बहुमताने जे सरकार निवडून आले. त्याने जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले पाहिजे होते, मात्र त्यांनी मनमानी व कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांना कायमचे पाणी पाजण्याचे काम जनतेनी करायचे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या आघाडीला राज्यातील सर्व ४८ जागा मिळतील, तेव्हा या सरकारच्या हुकुमशहांना जनतेच्या आदालतीमध्ये उभा करणारा बेलीफ मीच असेन, असेही उदयनराजे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

1 hour before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

13 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

13 hours before

खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांना दि.२६ ते ३१ आँगस्ट कालावधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात क्रांतीज्योती अंतर्गत महिला सदस्यांना दि.२६ ते २८ आणि पुरुष सदस्यांना दि.२८ ते ३१ आँगस्ट या

13 hours before