04:16pm | May 03, 2018 |
सातारा : भाजपची थिंक टँक असलेल्या दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सातारा जिल्ह्यातील जनसंघाच्या व सध्याच्या भाजप कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. आज महाजन हयात नाहीत, पण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत त्यांच्या स्मृतींना सातार्यातील निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी उजाळा दिला. त्यामुळे महाजन यांच्या अनेक आठवणी पक्षातील नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करायला लावणार्या ठरल्या आहेत.
1980 च्या दशकात जनता युवाच्या माध्यमातून प्रमोद महाजन यांचे सातार्यात रातराणी गाडीने आगमन होत होते. त्यावेळी भगवानदास गुजर, डॉ. लावंघरे, प्रकाश बडेकर, डॉ. गजाभाऊ कुलकर्णी, आराणके, संजय कोल्हटकर, मधु पवार, डॉ. दिलीप येळगांवकर, गजानन चिवटे अंजली कुलकर्णी अशा कट्टर भाजप निष्ठावंतांसोबत महाजन यांनी सातारा जिल्हा पिंजून काढला होता. केंद्रीय मंत्री झाल्यानंतरही महाजन यांनी सातार्याशी नाळ तुटू दिली नव्हती. एकदा सातार्यात आलेल्या प्रमोद महाजन यांना डॉ. लावंघरे यांनी सत्यनारायणाच्या पुजेनिमित्त आग्रहाचे निमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्विकारले. हातात प्रसाद घेतला. तुम्ही दिलेला प्रसाद मी शिरा म्हणून खातो. कारण सत्यनारायण व देव या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. मी माणुसकी हाच धर्म मानणारा आहे, असे त्यांनी ठासून सांगितले होते. त्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आजही सातार्यात आहेत. आज या प्रसंगाला 38 वर्षे लोटली आहेत. पूर्वी भाजपला जातीयवादी पक्ष अशी हेटाळणी करणार्या काही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हातात कमळ घेवून भाजपच्या कार्यप्रणालीचे तोंड भरुन कौतुक करण्यास सुरुवात केली आहे, हा काळाचा महिमा आहे.
सातारा नगरपरिषदेचे भाजप गटनेते पद मिलिंद काकडे या मागासवर्गीय नगरसेवकाला देण्यात आले आहे. भाजप अनुसूचित जाती-जमातीचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, महिला अध्यक्षा श्रीमती गीता लोखंडे, शहराध्यक्ष म्हणून ओबीसी समाजाचे सुनिल काळेकर व जिल्हाध्यक्ष म्हणून विक्रम पावसकर या ओबीसी युवा नेत्याने समर्थपणे कार्यभार सांभाळला आहे. त्याचबरोबर सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, जनकल्याण प्रतिष्ठानचे पुरुषोत्तम जाधव अशी मोठी फळी सक्षमरित्या भाजपच्या धुरा वाहत आहेत. या कार्याचा पाया प्रमोद महाजन यांनी रचला आहे. त्यामुळे जुन्या निष्ठावंतांना भाजप विसलेला नाही. त्यामुळे प्रमोद महाजन यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन करताना सातार्यात पुन्हा भाजपचे कमळ फुलणार, अशी आशा पल्लवित झाली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |