07:09pm | Jun 03, 2018 |
सातारा : वाई-पाचगणी रस्त्यावर औध, पुणे येथून आलेल्या नव जोडप्यापैकी पती आनंद कांबळे याने वाहन थांबवताच त्याच्यावर खुनी हल्ला झाला व पत्नीला धक्काबुक्की झाली. हा हल्ला लुटमारीचा प्रकार असल्याचे भासवण्यात आले. परंतू या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून संशयित आरोपी व नववधूचे यांचे विवाहा अगोदर प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अवघ्या तेरा दिवसांतच हा विवाह संपुष्टात येवून पतीचा मृत्यू, तर प्रियकर गजाआड अशी परिस्थिती नववधूची झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील बाणेर याठिकाणी आनंद कांबळे व दिक्षा ओव्हाळ यांच्या घरच्यांच्या संमतीने मोठ्या धुमधडाक्यात 20 मे रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर नवविवाहित जोडपे दुसर्या एका जोडप्यासह पाचगणी-महाबळेश्वर याठिकाणी फिरावयास निघाले होते. घाट सेक्शन असल्यामुळे दिक्षा हिला उलटी होवू लागली. त्यामुळे वाहनचालकाला पसरणी घाटाशेजारी वाहन थांबवण्याचा इशारा आनंद कांबळे यांनी केला. दिक्षा उलटी करत असताना तिच्या शेजारी आनंद कांबळे उभे होते. अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आनंद कांबळेवर शस्त्राने अमानुषपणे हल्ला केला व दिक्षाला धक्काबुक्की केली. त्यानंतर त्यांनी तिच्या अंगावरील दागिने लुटून नेले. यानंतर जखमी झालेल्या आनंदला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्याने सांगितले. या घटनेनंतर सातारा व पुणे पोलिसांनी या मार्गावरील लुटारु टोळीचा सुगावा घेतला, पण त्यामध्ये तथ्य आढळले नाही. याबाबत विश्वासात घेवून औंध येथून तपासाच्यादृष्टिने माहिती गोळा केली असता संशयित आरोपी निखील मळेकर व नववधू दिक्षा यांचे विवाहपूर्व प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. त्यानंतर वाई पोलीस व एलसीबीने संशयित आरोपी निखील मळेकर याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने हे कृत्य केल्याचे कबुल केले. नवविवाहित फिरण्यासाठी पाचगणी-महाबळेश्वरला गेले असून ते पसरणी घाटात केव्हा येणार? याची माहिती आरोपीला कोणी दिली? याचाही तपास आता वाई पोलीस करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |