02:41pm | Mar 25, 2019 |
सातारा : आनेवाडी, ता. जावली येथे आज दि. 25 रोजी 1 च्या दरम्यान टोल भरण्याच्या कारणावरुन पिस्तुलातून गोळीबार झाला असून या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आनेवाडी टोलनाक्यावर आज दि. 25 रोजी मध्यरात्री पांढर्या रंगाची स्विफ्ट कार क्र. एमएच 12- एनजे 302 आणि फॉर्च्युनर कार क्र. एमएच 12 - केवाय 6466 व दुसर्या एका कारमधून आलेल्या काही लोकांनी टोल भरण्याच्या कारणावरुन टोलनाक्यावरील कर्मचार्यांना दमदाटी केली. यामुळे प्रकरण हातघाईवर आले. दोन्ही बाजूकडून धुमसाधुमशी झाल्यानंतर कारमधील एकाने आपल्या जवळील पिस्तुल काढून सुमारे सहा राऊंड हवेत फायर केले. दरम्यान, यामध्ये एकजण जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. आचारसंहिता सुरु असतानाच आनेवाडी टोलनाक्यासारख्या संवेदनशील ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी आनेवाडी टोलनाक्यावरील व्यवस्थापक पांडुरंग घनश्याम पवार रा. चिंधवली, ता. वाई यांनी याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |