सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात शुक्रवारी सांयकाळी चेन स्नॅचरने महिलेच्या गळ्यातील चेन व मोबाईल जबरदस्तीने चोरण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिलेने त्याला प्रतिकार केला. या झटापटीत चोरटा खाली पडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. दरम्यान, ही घटना पाहिल्यानंतर वाहतूक विभागातील पोलिसांनी सतर्कता बाळगत संशयिताला ताब्यात घेतले.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. महिला पायी जात असताना त्याठिकाणी चोरटा गेला व त्याने महिलेचा सोन्याचा ऐवज, मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करत स्वत: च्या वस्तू सोडल्या नाहीत. या झटापटीत तो संशयित खाली पडला. ही घटना आजूबाजूचे नागरिक पाहत होते. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून चोरट्याला चोप दिला. अचानक गर्दी व गोंधळ झाल्यानंतर परिसरात तणाावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती वाहतुकचे सपोनि विठ्ठल शेलार यांना समजल्यानंतर त्यांनी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात पॉईंट असणारे वाहतूक पोलिस धिरज चतुर व भगवान इंगुळकर यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून नागरिकांना शांततेचे आवाहन करत संशयिताला ताब्यात घेतले. पीसीआर व्हॅनला बोलावून घटनेची माहिती घेतली. चोरट्याला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी सिव्हीलमध्ये नेण्यात आले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |