सातारा : राधिका चौकात गणपती पाहण्यासाठी आलेल्या युवकाचे अपहरण करुन त्याच्याकडील ४ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी शुभम कांबळे (रा. बुधवार पेठ, सातारा) या तडीपार गुंडासह चार जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी विजय उर्फ ऋत्वीक विनोद कांबळे (वय१९, रा. बुधवार पेठ, सातारा) आणि रईस रफिक आत्तार (वय २१, रा. अंजली कॉलनी, गेंडामाळ) या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, तडीपार गुंडाने सातार्यात बिनधोकपणे खैंदुळ घातल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
संकेत रविंद्र लोखंडे (वय २१, रा. वनवासवाडी, खेड) याने याबाबतची तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार युवक हा एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. दि. १५ रोजी तो सातारा शहरात असणारे सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी एकटाच आला होता. गणपती पाहत असतानाच त्याला करंजे येथील एकजण ओळखीचा भेटला. त्याने संकेतला दुचाकीवरुन रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राधिका चौकात आणून सोडले. या परिसरात आल्यानंतर थोड्याच वेळात संकेतला त्याठिकाणी असणार्या शुभम कांबळेने बोलावून घेतले व ‘तुझ्याकडे काम आहे, चल असे म्हणत’ शुभमने त्याच्यासोबत असणार्या तिघांनी संकेतला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले.
दुचाकीवरुन संकेतला राधिका रोडवर असणार्या चिंचेच्या झाडाजवळ आणण्यात आले. याठिकाणी शुभम कांबळे व इतरांनी संकेतकडे पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे संकेतने सांगताच कांबळे व त्याच्यासोबत असणार्यांनी संकेत लोखंडेला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत असतानाच कांबळे व इतरांनी तक्रारदाराच्या खिशातून मोबाईल हँडसेट, २०० रुपये रोख असा ऐवज काढून घेतला. जबरदस्तीने मोबाईल व पैसे काढून घेतल्यानंतर संशयितांनी आणखी ५ हजार रुपये आणून दे, आणि मोबाईल हँडसेट घेवून जा, असे सांगत संकेतला त्या चौघांनी राधिका रोडवरच सोडून दिले.
या सर्व घटना घडामोडीमुळे संकेत लोखंडे घाबरला व त्याने शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्या घटनास्थळाची पाहणी केली असता ती शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तिकडे पाठवण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात शुभम कांबळेसह चौघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे गतीमान करुन दोन संशयितांना पकडले. दरम्यान, या घटनेतील मुख्य सुत्रधार शुभम कांबळे हा पसार असून पोलिस त्याचा शोध घेण्यात येत आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |