सातारा : थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या मिळकतीचा ताबा घेतल्याचा अहवाल देण्यासाठी मदतनीसामार्फत 10 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा येथील मंडलाधिकारी शिवाजी बबन पिसाळ (रा. सत्यमनगर, खेड) व खासगी व्यक्ती सतीश किसन कुंभार (रा. करंजे) या दोघांना बुधवारी दुपारी सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दरम्यान, मंडलाधिकारी शिवाजी पिसाळ याच्यावर आतापर्यंत हा दुसरा ट्रॅप झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथील आयडीबीआय बँकेने गोडोली येथील हॉटेल स्माईलच्या मालकाला तारणापोटी 3 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. संबंधित कर्जाची फेड वेळेत न केल्याने ते हॉटेल आयडीबीआय बँकेने जप्त केले होते. जप्ती प्रक्रिया पार पडल्यानंतर हॉटेलच्या मिळकतीवर ताबा घेतल्याचा अहवाल मिळण्यासाठी बँकेच्यावतीने सातारा मंडलाधिकार्यांकडे अर्ज करण्यात आला.
या अर्जानुसार अहवाल तयार करुन तो सातारा तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी मंडलाधिकारी शिवाजी पिसाळ आणि खासगी मदतनीस सतीश कुंभार या दोघांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच दिल्याशिवाय पिसाळ, कुंभार अहवाल तयार करणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबी विभागाने त्यानुसार याची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान पिसाळ, कुंभार यांनी 10 हजार रुपयांवर तडजोड केली. लाचेची रक्कम बुधवारी घेण्याचे ठरल्यानंतर दुपारी करंजे येथे सापळा रचण्यात आला. याठिकाणी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर कुंभार आणि पिसाळ यांना पकडण्यात आले. सातार्यात एसीबीचा ट्रॅप झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. यातील पिसाळ याच्याविरुध्द यापूर्वीही एसीबीचा ट्रॅप झाला असल्याची माजहती समोर आली आहे. दरम्यान, संशयित दोघांना अटक केल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |