कराड : कृष्णा कारखान्याच्या विरोधकांनी हिंमत असेल तर त्यांच्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी जे गुण उधळले त्याबद्दल बोलावे. त्यांनी शेतकरी सभासदांसाठी काय केले?, त्यांनी इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले? त्यांना तुरूंगात का जावे लागले? या प्रश्नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत, असे आव्हान कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ.अतुल भोसले यांनी कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांना दिले. कापूसखेड (ता.वाळवा) येेथे आयोजित कारखाना सभासद संपर्क मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, संजय पाटील, गिरीश पाटील, दिलीप पाटील, अमोल गुरव, सुजीत मोरे, वाळवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत पाटील, बहे गावचे उपसरपंच मनोज पाटील, कापूसखेडचे माजी सरपंच प्रदीप पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, श्रीकांत पाटील, नेर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य शरद बल्लाळ, महेश पाटील, सयाजी पाटील, राजेश पाटील, शशिकांत पाटील, टी.वाय.पाटील, रवींद्र पाटील, कृष्णा बँकेचे संचालक दिनकर गडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.अतुल भोसले यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतानाच, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कारखान्याच्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखाही मांडला. ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत आम्ही सभासदांना मोफत साखर देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी अनेकांनी आमच्या या घोषणची खिल्ली उडविली. पण आम्ही ही घोषणा प्रत्यक्षात साकारून विरोधकांची तोंडे बंद केली. डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कारखान्याचे भत्ते नाकारून सहकारात एक नवा आदर्श निर्माण केला. याच काळात कारखान्याच्या इतिहासात सर्वाधिक गाळप झालेले आहे. विरोधकांनी त्यांच्या काळात जे पोते 22 रूपयांना खरेदी केले, तेच पोते आम्ही अवघ्या 13 रूपयांना घेऊन कारखान्याचे कोट्यवधी रूपये वाचविले. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पांनी सुरू केलेली उच्चांकी दराची परपंरादेखील डॉ. सुरेशबाबांच्या काळात जपली गेली. एवढा चांगला कारभार सुरू असतानाही विरोधक मात्र कारखान्याच्या कारभारावर बोलण्यापेक्षा अन्य मुद्यांवरच बोलून सभासदांची दिशाभूल करत आहेत. विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या 5 वर्षाच्या काळात काय गुण उधळले याची माहिती जरा सभासदांना द्यावी, म्हणजे तुमचे खरे रूप उघड होईल.
निवडणुका जवळ आल्यामुळे ज्यांनी कारखान्याच्या प्रॉपर्टीवर, शेतकरी, वाहतूकदारांवर कर्ज काढले आणि त्यासाठी ज्यांना तुरूंगात जावे लागले, त्यांच्या अंगात आता इलेक्शनचे वारे शिरलेय, अशी टीका माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्यावर करत कापूसखेडचे माजी सरपंच प्रदीप पाटील म्हणाले, की कृष्णावर आता भोसले पॅनेलची सत्ता नसती तर हा कारखाना केव्हाच भंगारात गेला असता. आज सुरेशबाबांच्या नेतृत्वामुळे कारखाना चांगली प्रगती करत आहे. पण विकासावर बोलायला विरोधकांकडे मुद्देच नसल्याने ते सोशल मिडियातून नको ती टिका करत आहेत. हॉस्पिटलवर आणि ट्रस्टवर टीका करणार्या विरोधकांनी जरा त्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होऊन उपचार घ्यावेत आणि तिथं मिळणार्या सेवासुविधांची माहिती घ्यावी.
सुरेशबाबांच्या नेतृत्वात काम करायला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानस्पद गोष्ट असून, या काळात कारखान्याची कोट्यवधी रूपयांची बचत करण्यात आणि कारखाना सुस्थितीत आणण्यात आम्हाला यश आले, असे प्रतिपादन संचालक लिंबाजीराव पाटील यांनी केले.
यावेळी राजेंद्र पाटील, संपत पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत कारखान्याच्या प्रगतीसाठी सहकार पॅनेलच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला तंटामुक्तीचे समितीचे माजी अध्यक्ष हौसेराव पाटील, सुरेश देसाई, जयकर पाटील, सुरेश पाटील, परशुराम पाटील, भाऊसाहेब मोकाशी, डॉ. एस. व्ही. पाटील, हनुमंत कुंभार, पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, भानुदास देसाई, सिकंदर मुल्ला, विजय मोकाशी, बाजीराव पाटील, संदीप पाटील, श्रीकांत पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |