सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये एसटीमध्ये घुसून वडापगिरी करणार्याला कंडक्टरने हटकल्यानंतर कंडक्टरलाच शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केल्याप्रकरणी किरण बिभीषण शिंदे (वय 22, रा.करंजे) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भरदुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
सुभाष किसन भोसले (वय 56, रा.मुंबई) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते नेहरुनगर, मुंबई येथील एसटी डेपोमध्ये सध्या कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार सुभाष भोसले हे दुपारी सातारा-दादर ही एसटी घेवून दादरला निघाले होेते. दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास ते एसटीमध्ये आल्यानंतर एक अनोळखी युवक एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांन खाली उतरण्यास सांगून बाहेर उभ्या असलेल्या खासगी वाहनातून जाण्यास सांगत होता.
कंडक्टर सुभाष भोसले यांनी ही बाब पाहिल्यानंतर अनोळखी युवकाला एसटीमधून खाली उतरण्याची सूचना केली. या घटनेने युवक चिडला व त्याने थेट कंडक्टरला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाणीस सुरुवात केली. या सर्व घटनेने एसटीमधील प्रवासी घाबरले व एकच आरडाओरडा सुरु झाला. संशयित शिवीगाळ खाली उतरत असतानाच परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. यावेळी एसटी स्टँड डेपोतील पोलिस चौकीमधील पोलिस हवालदार अरुण दगडे व केतन शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती घेवून पोलिसांनी संशयित किरण शिंदे याला ताब्यात घेतले. यावेळी एसटी डेपोतील इतर कर्मचारी मोठ्या संख्येने जमू लागले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जमू लागलेल्या जमावाला पांगवले. पोलिस चौकीत नेवून संयिताकडे व कंडक्टरकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर दोघांना पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात नेले. यावेळी कंडक्टर सुभाष भोसले यांनी संशयित किरण शिंदे याच्याविरुध्द तक्रार दिल्याने पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |