06:20pm | Apr 22, 2018 |
सातारा : मुगाव, ता. कोरेगाव येथे दलित कुटूंबाने नळ कनेक्शनची मागणी करुनही ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन न दिल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये या कुटूंबाची पाण्यासाठी अक्षरश: तडफड सुरु आहे. या कुटूंबातील महिला कॅन्सरग्रस्त असून या महिलेला चार- चार मैलांवरुन पाणी आणावे लागत आहे. दरम्यान हा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती जमातींच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने या कुटूंबाला भेट देवून संबंधित कुटूंबाला ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोरेगाव सातारा रस्त्यावर कोरेगावपासून जवळच मुगाव हे गाव असून विनोद दिलीप सकट व सविता विनोद सकट हे कुटूंब मुगावमध्ये राहते. हे कुटूंब मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करते. असे असताना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शनची मागणी करुनही ग्रामपंचायतीने या कुटूंबाला नळ कनेक्शन दिलेले नाही. विनोद सकट यांच्या पत्नीला पोटाचा कॅन्सर असूनही त्यांना चार-चार मैलांवरुन पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी दररोज हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असूनही त्यांनी इकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. मात्र हा प्रकार भाजपच्या सातारा जिल्हा युवा मोर्चा अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष रमेश उबाळे यांना समजल्यानंतर त्यांनी या कुटूंबाला भेट दिली असता विनोद सकट यांनी ग्रामपंचायतीकडे रितसर नळ कनेक्शनसाठी डिपॉझिट भरुनही या कुटूंबाला नळ कनेक्शन दिले नसल्याची माहिती पुढे आली. तसेच ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याची पाईप लक्ष्मण कोंडिबा पिसाळ यांच्या जागेतून गेलेली असून राजकीय द्वेषापोटी पिसाळ हे या दलित कुटूंबाला नळ कनेक्शन देण्यासाठी विरोध करीत असल्याचेही रमेश उबाळे यांना समजल्यानंतर त्यांनी थेट जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेवून दलित कुटूंब सकट यांची पाण्यासाठी अडवणूक केल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता असून आ. शशिकांत शिंदे यांनी लक्ष घालून या कुटूंबाला नळ कनेक्शन देण्याचा ग्रामपंचायतीला आदेश द्यावा, असेही उबाळे यांनी यावेळी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |