सातारा : तेटली, ता. जावली येथील शासकीय जमिनीवर जिल्ह्यातील राजकीय गॉडफादरच्या आशीर्वादाने बोगस सातबारे तयार करुन शासकीय जमिनीवर डल्ला मारण्यात आला होता. हे प्रकरण सर्वप्रथम ‘सातारा टुडे’ने उजेडात आणले होते. या प्रकरणी मेढा तहसिलदार यांनी सातार्यातील एका बड्या बिल्डरच्या पत्नीच्या विरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सातार्यातील स्थानिक गुन्हे शाखा आणि मेढा पोलीस संयुक्तरित्या करीत आहेत. परंतू जिल्हा महसूल विभागाने या प्रकरणात त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची हालचाल न केल्यामुळे या बोगस सातबार्याचा ‘ड्रॅगन’ संपूर्ण जिल्हाच गिळंकृत करण्याच्या मार्गावर आहे.
तेटली, ता. जावली येथील सर्व्हे नं. 104/2, 109/4 मधील पैकी 1 हेक्टर 10 आर, 60 गुंठे, 87 गुंठे जमीन सर्व्हे नंबर अस्तित्वात नसताना ते सर्व्हे नंबर अस्तित्वात आणून त्याद्वारे सातारा येथील बांधकाम व्यवसायिक श्रीधर कंग्राळकर, त्यांची पत्नी व मुलांच्या नावे बनावट साठेखत व खरेदीपत्र तयार करुन त्यांच्याकडून या व्यवहारासाठी 20 लाख रुपये घेतल्याची फिर्याद श्रीधर कंग्राळकर व त्यांच्या कुटूंबियांनी 29 जानेवारी रोजी मेढा पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा करीत होती. तपासादरम्यान नितीन भानुदास काळे (वय 34, रा. सैदापूर, ता. जि. सातारा), दिलीप भुवाल सहाणी (वय 27, रा. सैदापूर, सातारा), भरत नामदेव सूर्यवंशी (वय 32 रा. लांडेवाडी, औध, ता. खटाव, जि. सातारा), राहुल आनंद धनावडे (वय 28, रा. विवर, ता. जावली, जि. सातारा), संभाजी रावसाहेब घाटगे (वय 57 रा. सैदापूर, ता. जि. सातारा), सारिका राजेंद्र जाधव (वय 37 रा. आंबवडे खु. ता. जि. सातारा) यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आल्यानंतर बोगस सातबारा तयार करणे, त्याद्वारे त्याचे दस्तावेज अस्तित्वात आणल्या प्रकरणी व बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात मेढा पोलीस ठाण्यात भादंवि 420, 465, 466, 467, 468, 471, 472, 120 ब सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66, 66 क, 66 ड या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सध्या हे आरोपी जामिनावर सुटून बाहेर आहेत. या मंडळींनी जिल्ह्यात पाचगणी, वाई, फलटण तालुक्यातील कोट्यवधी रुपये किंमतीच्या जमिनींचे बोगस सातबारे बनवून ती पुणे- मुंबईमधील बिल्डर तसेच व्यवसायिकांना विकल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात सातारा स्थानिक गुन्हे शाखेने 6 मार्च रोजी राष्ट्रवादीचा पदाधिकारी संतोष काशिनाथ मालुसरे (वय 40, रा. फुरुस, ता. जावली) याच्यासह माजी पोलीस पाटील एकनाथ देवजी मालुसरे (वय 63, रा. केळघर तर्फ सोळशी, ता. जावली) यांना अटक केली होती. हे दोन आरोपीसुद्धा जामिनावर बाहेर आहेत.
शासनाच्या महत्त्वकांक्षी पेपरलेस अभियानाचा ऑनलाईन सातबारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. परंतू ऑनलाईन सातबार्यासाठी लागणार्या डिजिटल सिग्नेचर (डोंगल)चा गैरवापर करुन जावली तालुक्यातील या भूमाफिया टोळक्याने आतापर्यंत शेकडो एकर जमिनीचे सातबारे बनविले असल्याचे महसूल विभागातच बोलले जात आहे. बोगस सातबारा प्रकरणी एवढे मोठे महाभारत होवूनसुद्धा जिल्हा महसूल विभाग गांधारीच्या भूमिकेत वावरत आहे. जिल्हाधिकार्यांसह महसूल उप जिल्हाधिकारी आपले हात या प्रकरणी हात झटकत आहेत. एवढा निष्काळजीपणा जिल्हा प्रशासनाला नक्कीच घातक ठरणार आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करीत आहेत. परंतू जिल्हा महसूल खाते याबाबत स्वतंत्र तपास समिती नेमणार होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इतर घोळांमुळे ही तपास समितीही घोषणेप्रमाणेच हवेत विरुन गेली आहे. त्यामुळे बोगस सातबारे बनविणार्या भूमाफियांना महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा चरायला मोकळे रान मिळालेले आहे. बोगस सातबार्याचा ‘डॅ्रगन’ हळूहळू जिल्ह्यातील शेकडो एकर जमिनी गिळंकृत करीत आहे. परंतू महसूल विभागाला मात्र या प्रकरणात मोठे ‘कांड’ झाल्यानंतरच जाग येणार आहे. तोपर्यंत मात्र हातची वेळ गेलेली असणार आहे. त्यावेळेस कपाळावर हात मारुन घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |