02:41pm | Apr 16, 2018 |
सातारा : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाची रविवारी दुपारी लिफ्ट बंद पडून लहान मुलांसह तिघेजन तब्बल दोन तास अडकले. सिव्हील प्रशासनाचे मात्र तिकडे कोणीच न फिरकल्याने अखेर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून लिफ्टचे दार तोडून त्यामध्ये अडकलेल्या तिघांना सुखरुप बाहेर काढले.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी, सुवर्णा इंगवले (रा.तासगाव जि.सांगली) या उपचारासाठी दोन मुलांसमवेत आल्या होत्या. दुपारी सिव्हीलच्या लिफ्टमध्ये गेल्यानंतर लिफ्ट सुरु झाली मात्र लगेचच बंद पडली. या घटनेने त्या घाबरल्या. लिफ्टमध्ये त्या लहान दोन्ही मुलांसोबत असल्याने मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. लिफ्टमधून आवाज येत असल्याने त्याठिकाणी इतर रुग्णांसह नातेवाईक घटनास्थळी जमले.
लिफ्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. दुर्देवाने मात्र लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. आतून मात्र ती माय दोन्ही मुलांसह बचावासाठी आरडाओरडा करत होती. सुमारे एकतास हा गोंधळ सुरु असताना मात्र लिफ्टचा टेक्निेशियन व सिव्हीलचे कोणीही तिकडे फिरकले नाहीत. याच दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी हरिदास जगदाळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेवून पाहणी केल्यानंतर अखेर लिफ्टचे दार तोडून आत अडकलेल्या तिघांना बाहेर काढले.
लिफ्टमधील महिलेसह दोन्ही मुले बाहेर आल्यानंतर त्यांना हायचे वाटले. लिफ्टबाबत वारंवार तक्रारी होत आहेत. मात्र सिव्हील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब एखाद्या जिवावर उठण्याची शक्यता असल्याने तत्काळ लिफ्टची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. सिव्हील प्रशासन मात्र याबाबत वेळ काढूची भूमिका घेत असल्याने त्याबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |