04:06pm | Mar 26, 2018 |
सातारा : दशरथ नंदना.... बाळा... जो जो रे यासारख्या पारंपारिक पाळणागीतांनी आज सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात दुपारी 12 वाजता रामनवमीचा श्रीराम जन्मसोहळा साजरा झाला.
सातारा शहरातील विविध राममंदिरात या सोहळ्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. रामनवमीच्या दुपारी बारा वाजता जन्मपर्वकाळानिमित्त प्रभु श्रीरामाचे जन्माचे आख्यान, महिलांकडून पाळणागीताचे गायन, व महाआरती सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सुंठवडा व प्रसाद वितरण करण्यात आला.
समर्थ मंदिर परिसरातील श्री दामले राममंदिरात रामजन्मासाठी वेदमूर्ती हरिरामशास्त्री जोशी यांनी जन्मकाळाचे वर्णन अतिशय भावपूर्ण वातावरणात सादर केले. त्यानंतर जन्मकाळाचे वेळी गुलाल व पुष्पांजली उधळत रामनामाचा गजर करण्यात आला.
शहरातील काळाराम मंदिर येथे सुरू असलेल्या रामनवरात्रानिमित्तच्या राम यज्ञाची सांगता वेदमूर्ती शैलेश केळकर यांनी पूर्णाहूतींने केली. शहरातील प्रतापगंज पेठेतील गोराराम मंदिरात जन्मकाळानंतर पालखी सोहळा संपन्न झाला. शहर परिसरात गेंडामाळ येथील श्रीरामध्यान मंदिर, शनिवार पेठेतील शहा राममंदिर, फुटका तलावानजिकचे माटे राममंदिर, खणआळीतील मारवाडीराम मंदिर, व्यंकटपुरातील दिवेकर राम मंदिर, तसेच संगम माहूलीतील पंचधातूच्या सुरेख मूर्ती असणार्या श्रीराम मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.प्रतापगंज पेंठेतील श्रीराम मंडळानेही राम जन्म साजरा करत सायंकाळी रामरथाची मिरवणुक काढली होती.
रामनामाची महती संपूर्ण जगाला पटवून देणार्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जन्मगावी गोंदवले बुद्रुक येथील श्री थोरले राम, व धाकटे राममंदिरात अलोट भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कडाक्याचे ऊन असूनही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
समर्थ स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावर स्वत: रामदास स्वामींनी पूजन केलेल्या पंचधातूच्या राममूर्तींच्या दर्शनासाठी व जन्मकाळासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
चाफळ येथील श्रीराम मंदिरातही राम जन्मासाठी जिल्ह्यातून अबाल वृद्धांनी गर्दी केली होती. चाफळ येथे या निमित्त रामयात्रा संपन्न झाली. संगमरवरी मंदिराचे प्रवेशद्वारात बांधण्यात आलेल्या पाळण्यावर उपस्थितांनी फुले व गुलाल खोबर्याची उधळण करत रामनामाचा जयघोष केला.
फलटण येथील नाईक निंबाळकर राज्यघराण्याचे कुलदैवत असलेल्या श्रीराममंदिरात जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला. दुपारी जन्मसोहळ्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील वेचले,शेंद्रे, नागठाणे,रहिमतपूर,वावरहिरे येथील राममंदिरात मोठ्या उत्साहात रामनवमी संपन्न झाली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |