02:28am | Apr 13, 2019 |
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शुक्रवारी सातारा शहर व उंब्रज पोलिस ठाण्याअंतर्गत असणार्या दोन टोळ्या तडीपार केल्या. दोन टोळ्यांमध्ये एकूण सहा जणांचा समावेश आहे. संशयितावर दारुविक्री, मारामारी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आणखी काही टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत.
चेतन प्रदीप सोलंकी (वय 31, रा.सदरबझार), चंदन माणिक वाघ (वय 27, रा.चाहूर ता.सातारा) अशी सातार्यातील तडीपार केलेल्या टोळीचे नाव आहे. शहर पोलिसांनी या दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो पोलिस अधीक्षकांकडे पाठवला असता गुरुवारी त्याला मान्यता मिळाली.
संदीप भानुदास भिंताडे (वय 25, रा.जाळगेवाडी ता.पाटण), सागर उर्फ बंडा शंकर गायवाड (वय 27, रा.उंब्रज), सोन्या उर्फ शाहीद शब्बीर मुल्ला (वय 22, रा.उंब्रज), रोशन उर्फ रोश्या अरविंद सोनावले (वय 21, रा.उंब्रज) असे तडीपार केलेल्या दुसर्या टोळीचे नाव आहेे. पोलिसांनी दोन्ही टोळ्यांना सुधारण्याची संधी दिली होती. पोलिसांनी त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. समाजातून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. भविष्यात त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता होती.
शुक्रवारी पोलिस अधीक्षकांच्या प्राधिकरणाने दोन्ही टोळ्यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. येत्या 48 तासामध्ये संशयितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. समाजात भिती, दहशत पसरवणार्या गुंडांचे, चोर्या करणार्या व दंगल करणार्यांविरुध्द कठोर कारवाईचा इशारा यानिमित्ताने पोलिसांनी दिला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |