02:12am | Jan 21, 2019 |
सातारा : कराड शहरात घरफोड्या करून लाखोंचा माल लंपास करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पोलिसांनी सव्वा लाखाच्या मुद्देमालासह दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. रोशन अरविंद सोनावले (रा. उंब्रज पोलिस ठाण्यापाठीमागे, उंब्रज) प्रथमेश महेंद्र वाघमारे (रा. तळबीड) अशी ताब्यातील चोरट्यांची नावे आहेत.
गतवर्षी दिवाळीपासून जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरट्यांनी उच्छाद मांडत लाखोंचा माल लंपास केला होता.याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला केल्या होत्या.
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी मसूर फाटा येथे सापळा लावला होता. यावेळी त्यांनी पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरटे व महाविद्यालयीन युवकांची वाहन तपासणी सुरू केली होती. दरम्यान त्यांना दोन युवक संशयितपणे दुचाकीवरुन जाताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताच, ते पळून निघाले होते. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करुन त्या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, एक दुचाकी, दोन लॅपटॉप, एक एलईडी टीव्ही, पाच मोबाईल असा एक लाख 13 हजार पाचशे रुपयांचा ऐवज मिळाला. यावेळी कराड शहरातील एकूण बारा घरफोड्या केल्याची कबुली ताब्यातील दोघांनी दिली आहे. पुढील तपासकामी त्यांना कराड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत , विजय सावंत यांनी केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |