06:08pm | Mar 30, 2018 |
सातारा : जन्मदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. हा क्षण वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे हा वर्षातील अभूतपूर्व दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पण ही धडपड कधी-कधी चांगलीच अंगलटही येवू शकते, याची कल्पना मात्र त्या ‘बर्थ डे बॉय’ला नसल्यामुळे भलतेच काहीतरी घडून बसल्याच्या काही घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. यापासून काहीही बोध न घेता आपले घोडे पुढे दामटण्यातच काहीजण धन्यता मानत असतात. असाच काहीसा प्रकार काल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत घडलेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल दि. 29 रोजी सातारा-जावली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये सुशिक्षीत बेरोजगारांचा मेळावा आयोजित केलेला होता. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी तसेच विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी वाढदिवसाचा केक कापण्यासाठी भल्या मोठ्या तलवारी आणण्यात आल्या होत्या. इवलासा केक कापण्यासाठी एवढ्या मोठ्या तलवारींची काय गरज, असा प्रश्न उपस्थितांपैकी अनेकांना पडलेला होता. मात्र, व्यासपीठावर असणार्या राष्ट्रवादीजनांना मात्र कार्यक्रमानिमित्त झालेल्या गर्दीचा एवढा कैफ चढला होता की, आपण नक्की काय करतोय, याचे साधे भानही त्यांना राहिलेले नव्हते. तलवारीने केक कापून काय हाशील होणार, याबाबतचे उत्तर फक्त आणि फक्त तलवार उंचविणार्यांनाच माहित असणार.
जिल्ह्यात सध्या जिल्हा दंडाधिकार्यांनी विविध सण, उत्सव, जयंत्यांच्या निमित्ताने जिल्ह्यात शस्त्रबंदी लागू केलेली आहे. असे असताना जिल्हा दंडाधिकार्यांचा आदेश फाट्यावर मारुन राष्ट्रवादीजनांनी काल केलेली आगळीक पोलीसांना कशी दिसली नाही? यावेळी जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये अधिकार्यांसह बंदोबस्तासाठी सुमारे दोन डझन पोलीस उपस्थित होते. असे असताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या तलवारी व्यासपीठावर गेल्याच कशा, याचे उत्तरही संबंधित अधिकार्यांना द्यावे लागणार आहे. यावेळी व्यासपीठावर आमदारांसह विधान परिषदेचे सभापती उपस्थित होते. असे असताना तलवारींचा मुक्त हस्ते वापर व्यासपीठावर करण्यात आला. याबाबत संबंधितांनी परवानगी घेतली होती काय? या बाबीही तपासून पहाव्या लागणार आहेत.
एरव्ही शहरातील फळकूट दादा दुचाकीच्या पाठिमागील सीटवर केक ठेवून तलवारीने केक कापण्याच्या घडना आजपोवेतो उघडकीस आलेल्या आहेत. पोलिसांनी शक्य होईल व ज्ञात झालेल्या अशा फळकूट दादांवर तलवारीने केक कापल्याबद्दल अवैध शस्त्र बाळगणे प्रकरणी (आर्म ऍक्टनुसार) गुन्हे दाखल केलेले आहेत. असे असताना या फळकूट दादांना वेगळा आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वास्तविक भारतीय संविधानाने राव असो, वा रंक असो. सर्वांना समानाधिकार दिलेले आहेत. असे असताना लोक प्रतिनिधींबाबत वेगळा नियम व कायदे आहेत काय, याबाबतचा खुलासा संबंधित यंत्रणेने करायला हवा. सरंजामीशाही उखडून या देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान स्विकारलेले आहे. मात्र, जिल्ह्यात तत्कालीन राजे-रजवाड्यांकडून अजूनही सण, उत्सव व वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारबाजी केली जात आहे. त्यांच्या या कृत्यामुळे संविधानाला बाधा पोहोचते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
पेन्शनरांची सिटी म्हणून नावाजलेले हे शहर पुन्हा एका धगधगते रण होवू लागले आहे. कालच्या तलवारबाजीच्या निमित्ताने हेच अधोरेखित झाले आहे. तुम्ही एकमेकांची जिरवा परंतू सातारकरांना वेठीस धरु नका, अशी आर्त विनवणी सातार्यातील ज्येष्ठ नागरिकांनी सातारा टुडे शी बोलताना केली आहे. दरम्यान, कालच्या तलवारबाजीच्या घटनेची जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी दखल घेवून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सातार्यामधून होवू लागली आहे.
"आपले पद, आपली गरिमा याचे भान तरी तलवार उंचावते वेळी संबंधितांनी ठेवायला हवे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात इथून पुढे शक्तीप्रदर्शनाची रेलचेल बघायला मिळणार आहे. आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन बदलण्यावरुन सुरुची बंगल्यावर झालेला राडा सर्वश्रुत आहे. त्यावेळी मुडदे पडता-पडता राहिले होते. अनेक मी-मी म्हणवणारे नामचीन पोलिसांच्या भीतीने पृष्ठभागाला पाय लावून पळाले होते. काहीतर अजूनही परागंदा आहेत. ही घटना ताजी असतानाच वाढदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या तलवारबाजीमुळे सातारकरांच्या कपाळावर पुन्हा (?) आठ्या उमटल्या आहेत. या तलवारीबाजीमुळे सातारकरांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागलेला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |