पाटण : पाटण तालुक्यातील सांगवड मार्गे बहुलेकडे जाणार्या भरळी घाटात दुचाकीस्वाराने शिक्षकाच्या दुचाकीला लाथ मारून शिक्षकाच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये शिक्षक अरुण भिकाजी पानस्कर (वय 41) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (दि. 23) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अरुण भिकाजी पानस्कर हे माध्यमिक शिक्षक असून ते पाटण तालुक्यातील बहुलेश्वर विद्यालय बहुले येथे कार्यरत आहेत. सोमवारी ते पाटणहून सांगवड मार्गे बहुले येथे शाळेत निघाले असताना सकाळी या मार्गावरील भरळी घाटात पाठीमागून येणार्या अज्ञात मोटारसायकलस्वाराने अचानक शिक्षकाच्या दुचाकीला लाथ मारून पानस्कर यांची गाडी रस्त्यावर पाडली. त्यानंतर संबंधिताने पानस्कर यांच्या डोक्यात दगड घालून तेथून पलायन केले. यामध्ये पानस्कर गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेची नोंद पाटण पोलिसांत झाली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार के. आर. खांडे करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |