01:12am | Jan 14, 2020 |
सातारा : मागासवर्गीयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, त्यांच्या विकासाचा योजनेतील निधीत हेराफेरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर ) गटाच्या अधिकारी व कार्यकर्त्यांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील विविध प्रकारच्या महामंडळांची महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास चर्मकार, वसंतराव नाईक खादी ग्राम उद्योग कर्ज वितरण करण्यासाठी अनेक अटी, शर्ती आहेत. त्यामध्ये सबसिडी दिली जाते, त्यामुळे अनेक मागासवर्गीय व अल्पसंख्यांक बेरोजगारांना कर्जासाठी शेतीचे उतारे, घराचे उत्तरे घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी राज्यात पडलेला दुष्काळ, अतिवृष्टी महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे तरुणांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम नियमित न भरल्यामुळे जप्ती सारख्या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे. तरुणांना दिलेले सरसकट कर्ज माफ करावे. सातारा नगरपालिकेमध्ये मागासवर्गीय समाजाची मागणी नसताना निधी खर्च करणे बंद करावे, सदर बाझार ते भिमाई स्मारक नाका रस्त्याचे काम बंद करून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, त्या ठेकेदाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत बिल देऊ नये. मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या काळातील २० टक्के निधीची चौकशी करावी. तसेच कनिष्क मंगल कार्यालय ते चर्च या रस्त्यावर कोट्यावधी रुपयांचा निधी टाकून मागासवर्गीय समाजाची फसवणूक सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केली आहे, त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
६० वर्ष रहिवासी असलेल्या कोंडवे, ता. सातारा येथील मागासवर्गीयांना हक्काचे पाणी व घर द्यावे. लाडेगाव, ता. खटाव येथील विश्वकर्मा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन, सचिव यांनी शासन व सभासदांची फसवणूक केल्याने संबंधितांवर शासनाने गुन्हे दाखल करावेत. सातारा जिल्ह्यात विशेष समाज कल्याण व जिल्हा परिषद समाजकल्याण याठिकाणी पूर्णवेळ अधिकारी अधिकारी द्यावा, आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या असून त्या मागण्या मान्य न झाल्यास २६ जानेवारी रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर दादासाहेब ओव्हाळ, संतोष जाधव, अश्विनी गायकवाड, मदन खंकाळ, अमित मोरे, संतोष जाधव, सुदाम गायकवाड, दीपक गाडे, अविनाश येवले, अपर्णा साळुंखे, उज्वला भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |