सातारा : सातारा कास हेरिटेज हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या पहिल्या पर्वात राजधानीसह राज्य व देशाभरातुन स्पर्धक उत्साहात व हर हर महादेवचा गजर करत सुसाट धावले. काल झालेल्या या स्पर्धेत सुमारे २ हजाराहून अधिक धावपटू उत्साहात धावले असून ही स्पर्धा विविध उपक्रमांनी उत्स्फूर्तपणे संपन्न झाली.
स्वरंग मराठी चॅनेलचे प्रवीण वानखेडे,कराड अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन समीर जोशी,कालिका पतसंस्थेचे चेअरमन व मॅरेथॉन असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून स्पर्धेचे उद्घाटन झाले.रविवारी पहाटे ६ वा. स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बाजूला क्रीडाप्रेमी व नागरिकांनी गर्दी केली होती. कम आॅन,वेलडन अशा घोषणा देत नागरिक टाळ्या वाजून स्पर्धकांना दाद देत होते.यावेळी मुख्य हाफ मॅरेथॉन असलेली २१ कि.मी.ची स्पर्धेत सुमारे ५५० स्पर्धक,तर १० कि.मी.च्या मॅरेथॉन स्पर्धेत १ हजार स्पर्धक व अथर्व फण रनमध्ये ८०० स्पर्धक धावले. यामध्ये तरुणांसह महिला,वृद्ध व चिमुकले यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. या स्पर्धेत १ वर्षांच्या चिमुरड्यांपासून ८५ वर्षाच्या वृद्धांपर्यंत अनेकांनी धाव घेतली.या स्पर्धेतील सुमारे ६ ते ७ किलोमीटर पर्यंतचे अंतर हे घाटातील अवघड असे चढणीचे असल्यामुळे स्पर्धकांची दमछाक होत होती. मात्र तरीही धावपटूंमध्ये उत्साह दिसून येत होता. एकमेकांना प्रेरणा देत सर्वजण स्पर्धेचे अंतर कापत होते.
मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन संदीपभाऊ शिंदे,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. निलेश थोरात, सचिव जयंत शिवदे, रेस डायरेक्टर डॉ.सुधीर पवार, डॉ.संतोष यादव,संतोष भामरे,शरद भोसले,सचिन धनावडे,राजेंद्र गायकवाड,संदीप माने,डॉ.प्रसाद साळुंखे,दमयंती गीते,पल्लवी नाईक,माधुरी शिवदे, नंदिनी भामरे, डॉ.स्मिता कदम, श्रेयश भामरे,अल्पना शहा,शुभांगी माने आदींनी परिश्रम घेतले.
सातारा हेरिटेज हिल मॅरेथॉनमध्ये मांढरदेवीच्या धावपटूंचा झेंडा
पहिल्या वर्षी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत मांढरदेव धावपटूंचा झेंडा फडकला आहे. आदिनाथ भोसले याने १ तास २० मिनिटांत, सुनील शिवणे याने १ तास २५ मिनिट ३८ सेकंद, रवींद्र जगदाळे याने १ तास ३१ मिनिट २५ सेकंद, तर लक्ष्मण यादव याने १ तास ५० मिनिटात सुमारे २१ किमीचे अंतर पार करून वयोगटानुसार प्रथम क्रमांक मिळविले.तर महिला गटात रेश्मा किवटे यांनी १ तास ३८ मिनिट १५ सेकंदात,ऐश्वर्या दोशी हिने २ तास १२ मिनिट २५ सेकंद व अश्विनी देव हिने २ तास १६ मिनिट ५६ सेकंदात हे २१ किमीचे अंतर पूर्ण करून यांनी वयोगटानुसार प्रथम क्रमांक पटकाविले आहेत.
मांढरदेव ता. वाई येथील आदिनाथ भोसले,हरिदास शिंदे,आदित्य भोसले,स्नेहल हिरवे,प्रतीक्षा मांढरे,वृषाली शिंदे,बाळू पुकळे,प्रतीक उंबरकर,हर्षवर्धन दबडे आदींऊ सुमारे २१ व १० कि.मी. मध्ये सुमारे अकरा धावपटूंनी क्रमांक पटकावून बक्षीस मिळविले आहे.अथर्व फण रनमध्ये विविध वेशभूषा साकारलेल्या स्पर्धकांना, तसेच विविध ठिकाणी मोलाचे सहकार्य करणाऱ्यांना मॅरेथॉनच्या वतीने गौरविण्यात आले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |