04:59pm | Apr 08, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये एक अनामिक भीती निर्माण झाली होती. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात एखाद्या संशयित व्यक्तीला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचे हुदंकेच आजपर्यंत ऐकायला मिळत होते. तब्बल महिन्यानंतर आज सकाळी प्रथमच जिल्हा रुग्णालयात टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला. ४५ वर्षीय कोरिना बाधित महिला पूर्णपणे बरी झाल्यानंतर ती घरी जायला निघाली असताना वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि पोलिसांनी तिला फुलांचा पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या कडकडातात तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या व्हिडीओला लाईक करत त्या महिलेवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा रुग्णालयात दोन विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात पुरुषासाठी एक आणि महिलांसाठी एक असे दोन विलगीकरण कक्ष उभारून त्याची धुरा वैद्यकीय अधिकारी विश्वास हिरास आणि सुपेकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परदेशातून आलेल्या अनेक व्यक्तीची प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यामुळे सातारा जिल्हा रुग्णालय हे केंद्रबिंदू ठरले होते.
सातारा जिल्ह्यातील आणि कॅलिफोर्निया येथून आलेल्या एका व्यक्तीला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. प्रथम त्याचा अहवाल निगेटिव्ह तर नंतर पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात एक अनामिक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात आणखी किती रुग्ण सापडतात याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना आज बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात एक अत्यंत आनंददायी घटना पाहायला मिळाली. येथील विलगीकरण कक्षात काही दिवसापासून जिल्ह्यातील एका ४५ वर्षीय कोरोना बाधित महिलेवर उपचार सुरु होते. तिच्या प्रकृतीवर आमोद गडीकर, ज्ञानेश्वर हिरास, डॉ. सुपेकर सातत्याने लक्ष ठेवून होते. तिच्या प्रकृती बाबतचा अहवाल दररोज जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात येत होता. वैद्यकीय तपासणी दरम्यान संबंधित कोरोना बाधित महिलेची प्रकृती अत्यंत चांगली आणि ठणठणीत झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने तिला घरी सोडण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेस घरी सोडण्यात आले. विलगीकरण कक्षातून ही महिला घरी जाण्यासाठी निघाली असताना वॉर्डमध्ये दुतर्फा वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि जिल्हा रुग्णालयातील पोलीस तीच्या स्वागतासाठी थांबले होते. संबंधित महिला वॉर्डमधून जिल्हा रुग्णालयाच्या पोर्चपर्यंत चालत येत असताना तिचे टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत करण्यात आले. पुष्पगुच्छचाही तिच्यावर वर्षाव करण्यात आला. गेल्या महिनाभरापासून सातारा जिल्हा रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना बाधित कोणता रुग्ण केव्हा दाखल होईल याची कोणतीही कल्पना नसताना एक कोरोना बाधित महिला जिल्हा रुग्णालयात बरी होऊन आपल्या घरी जात असतानाचे चित्र याच देही याच डोळा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाहायला मिळत असल्यामुळे बुधवारी जिल्हा रुग्णालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |