01:02am | Oct 10, 2019 |
सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक तसेच जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-सेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दि. 17 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदाच सातार्यात सभा होणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभाही मोदी यांच्या सभेच्या अगोदर होणार आहे. मात्र, शहा यांच्या सभेची तारीख अद्याप ठरलेली नाही, असे अधिकृत सूत्रांनी सातारा टुडे शी बोलताना सांगितले आहे. मात्र मोदी-शहांच्या सभांमुळे सातार्यातील वातावरण मात्र तापणार आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मोदी प्रथमच सातारकरांशी संवाद साधणार असल्याने सातार्यामध्ये या सभेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उदयनराजेंच्या या राजीनामा अस्त्रामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला भगदाड पडले. विधानसभा निवडणुकी अगोदरच निपचित पडलेल्या राष्ट्रवादीला हा जबर हादरा होता. राष्ट्रवादीने केलेला अन्याय तसेच सातार्याच्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करतोय, अशी कारणे माजी खा. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडण्याबद्दल सांगितली होती. परंतू उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीनेही उदयनराजेंविरोधात लढण्याचे जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्याच दिवशी उदयनराजेंविरोधात लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या तंबूतून उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. आ. शशिकांत शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील ते थेट शरद पवारांपर्यंत नावे चर्चिली गेली. शेवटी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनाच उदयनराजेंविरोधात निवडणूक आखाड्यात उतरवले गेले. जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीच्या एका जागेसह 8 विधानसभेच्या जागा भाजप-शिवसेना लढवत आहे. 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने सातारा हा आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला होता. परंतू तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर रालोआ ला विशेषत: भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून केंद्रात सरकार बनविता आले. नरेंद्र मोदींची दुसर्यांदा पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. केंद्रातील घडामोडींमुळे विधानसभा निवडणुकांअगोदरच महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या छातीत धडकी भरली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक विद्यमान आमदारांनी सेना-भाजपात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यातही कॉंग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात महायुतीला यश मिळाले. या पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. सातार्यातही विधानसभा तसेच लोकसभा पोटनिवडणुकीचा धुरळा उडाला आहे. परंतू राष्ट्रवादीनेही जिल्ह्यात तगडा प्रचार करीत भाजप-सेनेसमोर प्रतिआव्हान निर्माण केले आहे.
विधानसभेच्या आठ जागांसह सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जिंकण्याचा विडा युतीने उचललेला आहे. त्यामुळे दि. 17 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांसह भाजपा नेत्यांनी मोदींच्या सभेची सुरक्षेसह जय्यत तयारी केलेली आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उर्फ वकीलसाहेब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोदी उमेदीच्या काळात कार्यरत असताना लक्ष्मणराव इनामदार यांचे मोदी यांना मार्गदर्शन लाभले होते. सातारा जिल्ह्यातील खटाव हे लक्ष्मणराव इनामदार यांचे मूळ गाव. मोदी यांनी यासंदर्भात आपल्या सभांमध्ये वेळोवेळी याचा उल्लेख केलेला आहे. 17 तारखेला होणार्या सभेतही याचा उल्लेख निश्चितपणे होणार आहे. दरम्यान, सातार्यात होवू घातलेल्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय बोलणार, याबाबत सातारकरांना उत्सुकता लागलेली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |