फलटण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी येथील युवकांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून याबाबत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांनी केले आहे.
याबाबत फलटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगेश कर्वे (रा. बुधवार पेठ, फलटण) व मनोज माने यांनी 28 मार्च व 30 मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर प्रसारित केला होता. त्यामुळे हा मजकूर फलटणमधील काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांच्या निदर्शनास आल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्या असल्याबाबतची फिर्याद येथील सामाजिक कार्यकर्ते शाम सुभाष अहिवळे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेली आहे. फेसबुकवर पोस्ट प्रकाशित करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केल्याची बातमी शहरभर पसरताच फलटण शहर पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर शेकडो युवकांनी गर्दी केली होती. यावेळी फलटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांनी जमावाला शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, दोघा आरोपींवर या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत करीत आहेत.
मंगेश कर्वेच्या कृत्याचा नाभिक महामंडळाकडून निषेध
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी मंगेश कर्वेच्या कृत्याचा नाभिक समाजाशी काही संबंध नाही. असे कृत्य करणार्यास नाभिक समाज कदापिही पाठीशी घालणार नाही. मंगेश कर्वे याचा वापर करुन ज्यांनी हे षडयंत्र रचले आहे, त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा व संबंधितांवर कडक कारवाई करावी. दोन्ही समाजामध्ये एकतेची भावना कायमची रहावी, अशी अपेक्षा नाभिक समाजाची असून घडलेल्या कृत्याचा नाभिक संघटना तीव्र निषेध करीत आहे. अशा प्रकारचा निर्णय 31 मार्च रोजी फलटण येथे झालेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |