सातारा : देशात तसेच राज्यामध्ये कोरोना व्हायरसला रोखण्या.साठी सर्वत्र लाँकडाऊन झाहीर केला आहे त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातही अतिशय कडक लाँकडाऊनची अंमलबजावनी शासनाने केली आहे. त्याला लोकांनीही चांगले सहकार्य केले आहे, मात्र तरीसूद्धा काही अडचणी दिसून येत आहेत. त्याच बरोबर जनतेलाही काही अडचनींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कोणताही लोकप्रतिनीधी बोलताना दिसत नाही. तरी याबाबत पालकमंत्री यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेऊन सर्वपक्षीय आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे.
कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी कोणतेही पूर्व नियोजन न करता लाँकडाऊन जाहीर झाल्याने नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे भुकमारी यासारख्या विषयावर कोणीच बोलत नाही किवा त्यावर उपाययोजना आखताना दिसत नाही. काही सामाजिक संस्था, व्यक्ती, संघटना लोकांना मदतीचा हात देत आहेत, मात्र त्या मदतीला मर्यादा पडत आहेत याचा विचार करण्याची गरज आहे.
विषेशत: आम्ही पालकमंत्री व मुख्यमंत्री व जिल्हाधीकारी यांना वेळोवेळी निवेदनाद्वारे कही मुद्दे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्व केला. मात्र त्यावर विचार होताना दिसत नाही. त्यामध्ये हातावर पोट सणारे,रोजंदारीवर काम करणारे,फेरीवाले,छोटे फिरते व्यावसायिक,पारधी,कातकरी,भटके यांच्या भुकमारीच्या प्रश्नावर विचार करून प्रभावी उपाययोजना करने गरजेचे आहे. याचा विचार करता आणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सर्व लोकप्रतिनी आणी सर्व राजकीय पक्ष यांच्या प्रतिनीधींची सर्व पक्षीय बैठक निमंत्रीत करूनच हे प्रश्न शासनस्तरावर सोडवण्याची गरज असल्यानेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पालक मंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठकीची मागणी करण्यात येत आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |