कराड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पोने ऊस कामगार घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. ही घटना बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात टेम्पोंचालक व ट्रॅक्टरमधील दोघेजण असे एकूण तीनजण ठार झाले. तर तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुट्टाप्पा जयाप्पा बेनकनशेट्टी (टेम्पोंचालक, वय 35 रा. आळगवाडी, ता. रायबाग, जि. बेळगाव), नामदेव किसन साखरे (वय 40, रा. तांदूळवाडी, ता. धारूर, जि. बीड), कृष्णत महादेव काळे (वय 28, रा. सरफराजपूर, जि. बीड) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर शांताराम अच्युतराव चव्हाण (वय 35), राजमती विष्णू काळे (वय 25), ताई विष्णू काळे (वय 4, तिघेही रा. सरफराजपूर, जि. बीड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर बाजूने पुणेच्या बाजूला जात असताना खोडशी गावच्या हद्दीत आल्यानंतर टेम्पोचालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो क्रमांक (केए 22 डी 1878) ऊस कामगार घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला क्रमांक (एम. एच. 44 एस 2831) पाठीमागून जोराची धडक बसली. यामध्ये टेम्पोचालक पुट्टाप्पा बेनकनशेट्टी व ट्रॅक्टरमधील नामदेव साखरे हे जागीच ठार झाले. तर कृष्णत काळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. मात्र गुरूवारी सायंकाळी उपचार सुरू असताना कृष्णत काळे मयत झाले. तर ट्रॅक्टरमध्ये बसलेले ऊसतोड कामगार शांताराम चव्हाण, राजमती काळे, ताई काळे हे जखमी झाले. जखमींना हायवे हेल्पलाईनच्या कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, योगेश पवार, जितेंद्र भोसले यांच्या मदतीने तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट दिली. यावेळी पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली. कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रशांत जाधव व खलील इनामदार यांनी पंचनामा केला. या अपघाताची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. अधिक तपास इनामदार करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |