11:34pm | May 23, 2018 |
सातारा : राजधानी महोत्सव हा जनतेचा महोत्सव आहे, या महोत्सवास अनेकांचे सहकार्य लाभत आहे, राजधानी महोत्सवाच्या माध्यमातुन, मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साता-याची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण होईल, या महोत्सवात सर्व सातारकर जिल्हावासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित माजी जिल्हापरिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते राजधानी महोत्सवाच्या मंडप व मंचक उभारणीचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे,पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीचे संचालक व राजधानी महोत्सवाचे प्रेरणास्त्रोत पंकज चव्हाण, माजी जिल्हापरिषद सदस्य संदिप शिंदे, सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अंकुश जाधव, डॉ.शेखर घोरपडे, अॅड.विकास पवार, आदी प्रमुख उपस्थित होते.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राजधानी सातारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात शुक्रवार दिनांक 25 मे 2018 रोजी,सकाळी 9.00 वांजता इतिहासकालीन शस्त्रकलेचे प्रदर्शन शिवकालीन खेळांचे प्रदर्शन किल्ले अजिंक्यतारा येथे होणार असून, यावेळी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे गुरुवर्य संभाजी भिंडे गुरुजी, सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दिनांक 26/05/18 रोजी श्री.छ.शाहू क्रीडा संकुलामध्ये युवागिरी रॉक बॅन्ड शो सायंकाळी 6.00 वांजता आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दिनांक 27/05/18 रोजी सायंकाळी 6.00 वांजता, श्री.छ.शाहू क्रीडा संकूल येथेच राजघराण्याच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेच्या सातारा गौरव पुरस्कारांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांना वितरण केले जाणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना सातारकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दयावा असे आवाहनही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
दरम्यान दिनांक 24 मे 2018 रोजी श्री.शाहु स्टेडीयम येथे सकाळी 11.00 वांजता, सातारा जिल्हयातील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली असून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विचारांच्या आणि शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याप्रसंगी केले आहे.
मंडप उभारणी शुभारंभ प्रसंगी संग्राम बर्गे, माजी नगरसेवक संजय शिंदे, ईर्षाद बागवान, संजय पोतेकर-सर, विकासअण्णा शिंदे, आर.वाय.जाधव-सर, बाळासाहेब चोरगे, समृध्दी जाधव, सौ.गितांजली कदम, जितेंद्र खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |