सातारा : कुर्हाडीने जबर मारहण करून लुटमार करणाार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शिरवळ एसटी स्टँड येथे शिताफीने जेरबंद केले. अनिल अंकुश काळे वय 19 रा. शिवाजी चौक, विटभट्टीजवळ खंडाळा व दीपक उर्फ राजकुमार रामतिरत गौतम वय 20 रा. गोरखपूर (उ. प्र.) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कार व 11 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शिरवळ बसस्थानकावर दोघेजण पांढर्या रंगाच्या झेन कार (एमएच 12 एएफ 2670) मधून चोरी केलेले मोबाईल विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंह साबळे यांच्यासह पथकाने त्याठिकाणी सापळा रचला. यावेळी तेथे पांढर्या रंगाच्या झेन कारमधून दोघेजण संशयीतरित्या फिरताना आढळून आले. त्यांनी पोलिसांनी त्यांना थांबवून झडती घेतली असता त्यांच्याकडे 11 मोबाईल, एक एलसीडी टीव्ही मिळून आले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन साथीदारांसमवेत शिंदेवाडी (शिरवळ) गावच्या हद्दीत हॉटेल मांडवली येथे एकास कुर्हाडीने जबर मारहाण करून दोन मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. या कारवाईत पोलिसांनी एक कार, 11 मोबाईल, एलसीडी टीवही असा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, यांच्या सुचनानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंह साबळे, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, जोतीराम बर्गे, पोना मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रवीण कडव, पो. कॉ. गणेश कापरे, धिरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन यांनी सहभाग घेतला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |