सातारा : सातारच्या कर्तव्यदक्ष महिला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका महिलेवरील होणार्या अन्यायाबाबत स्वत: जातीने लक्ष घालून न्याय दिला. त्यामुळे संबंधित महिलेला जिल्हा प्रशासनाच्या पारदर्शक कारभाराची चुणूक पहावयास मिळाली. एका गरीब कुटूंबावर होणारा अन्याय दूर केल्याचे समाधान यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या चेहर्यावर पहावयास मिळत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर येथील मंगळवेढा येथून चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी दुष्काळाची झळा सहन न झाल्यामुळे ज्ञानेश्वर ऐवळे हा तरुण उपजिविकेसाठी सातारा जिल्ह्यात आला. कोणी गडी म्हणून शेतावर कामास घेतय का, म्हणून तो कामाचा शोध घेत असताना सातारा तालुक्यातील मुढेवाडी (फडतरवाडी) याठिकाणचे बागायतदार शेतकरी जगदाळे यांच्या शेतावर त्यांना काम मिळाले. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला. इमानदारी व मेहनती गुणांमुळे त्यांनी जगदाळे कुटूंबियांची मर्जी संपादन केली. जगदाळे यांनी ज्ञानेश्वर ऐवळे यांचे लग्नसुद्धा लावून दिले. त्यानंतर आपल्या शेतातील शेतमजूर म्हणून सेवा करणार्या ऐवळे याला कायमची अर्धी भाकरी मिळावी या मानवतावादी भावनेतून जगदाळे यांची पत्नी कमल केरबा देशमुख- जगदाळे यांनी मुंडेवाडी येथील गट नं. 396 येथील 11 गुंठे तसेच 394, 386 अ आणि ब मधील जमिनीचा काही भाग सौ. कल्पना ज्ञानेश्वर ऐवळे यांना खरेदीपत्र करुन दिला. या भावनेबद्दल आजही जगदाळे कुटूंबियांबाबत ज्ञानेश्वर कृतज्ञ आहेत. असे असताना सौ. कल्पना ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या नावावर असलेली गट नं. 396 मधील 11 गुंठे जमीन एका इसमाने विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. परंतू ही जमीन म्हणजे मराठा व मागासवर्गीय यांच्यामधील माणुसकीचा दुवा म्हणून मरेपर्यंत जतन करण्याचा ठाम विश्वास ऐवळे कुटूंबियांनी व्यक्त केला. त्यामुळे संबंधित इसमाने ऐवळे कुटूंबियांना त्रास देवून त्यांच्या शेतीचे नुकसान केले तसेच रस्त्यात खोदकाम केले आहे. सध्या ऐवळे यांचा वाहनचालक मुलगा वादविवाद नको यासाठी आपल्या कुटूंबियांसह सातारा येथे राहत आहे. ही बाब रिपब्लिकन ब्लू फोर्सचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ व क्रांतीकारक तालुकाध्यक्ष आनंद तथा बाबा ओव्हाळ यांना समजल्यानंतर त्यांनी या गरीब कुटूंबाला न्याय मिळावा, यासाठी सातारच्या जिल्हाधिकारी सिंघल यांची भेट घेतली. एका महत्त्वाच्या शासकीय बैठकीला जाण्यासाठी त्या निघाल्या असताना त्यांनी सौ. कल्पना ऐवळे व ज्ञानेश्वर ऐवळे यांची व्यथा ऐकून घेतली व तात्काळ सातारचे पोलीस अधीक्षक व प्रांताधिकारी यांना तातडीने लेखी सूचना करण्याचे आदेश दिले. या गोष्टीमुळे अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली. आयुष्यात प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दाखवलेली कर्तव्यभावना व माणुसकीने भारावून गेलेल्या ऐवळे कुटूंबिय व पत्रकार अजित जगताप यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याचा मनापासून गौरव केला. यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या अभ्यागतांनीही जिल्हाधिकार्यांचे कौतुक केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |