सातारा :माहेरहून सोने आणण्याच्या कारणावरुन पत्नी रिंकू उर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा आवळून खून केल्यााप्रकरणी भरत कांतीलाल ओसवाल (वय 31, रा. आयटीआय जवळ, गुलमोहोर कॉलनी, सातारा) याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधीश डी.ए.ढोलकिया यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, 2014 साली घडलेल्या घटनेनंतर सातार्यात महिला आक्रमक होवून मोर्चा निघाला होता. सुमारे चार वर्षानंतर अखेर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भरत ओसवाल हा पत्नी रिंकू उर्फ भाग्यश्री व इतर कुटुंबियांसमवेत राहण्यास होता. लग्नावेळी रिंकू हिच्या माहेरच्या मंडळींनी कमी दागिने केले यावरुन पती नाराज होता. ठरल्याप्रमाणे उर्वरित आठ तोळे दागिने घेवून येण्याच्या कारणावरुन भरत हा रिंकूचा छळ करत होता. तसेच लग्नाला सुमारे दोन ते तीन वर्षे झाली तरी मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुनही भरत हा रिंकूशी वारंवार वाद घालत होता. याबाबतची माहिती रिंकू यांनी फोनवरुन कुटुंबियांना माहिती दिली होती.
भरत याच्याकडून मात्र दिवसेंदिवस पत्नी रिंकूला त्रास देण्याच्या प्रमाणात वाढ होत होती. दि. 19 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री रिंकूला बहिणीचा फोन आला होता. फोनवर बोलत असतानाच भरत तेथे आल्याने, रिंकूने पती आल्याचे सांगत आपण सकाळी बोलू असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर जेवणखाण करुन रिंकू पतीसह बेडरुममध्ये गेली. याठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर भरत याने रिंकूचा गळा आवळला. गळा आवळल्याने रिंकू बेशुध्द पडली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरत याने रिंकू ला त्रास होत असल्याचे सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे कुटुंबियांना सांगितले.
भरत व इतर नातेवाईकांनी रिंकू ला बेशुध्द अवस्थेत सातार्यातील एका रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती रिंकूचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती रिंकूच्या माहेरच्या मंडळींना समजल्यानंतर त्यांनी सातार्यात धाव घेतली. रिंकूचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून तो मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर गळ्यावरील व्रण निदर्शनास आले. रुग्णालयाने याबाबतची माहिती माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याला दिली. शाहूपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एल. पांढरे हे कर्मचार्यांसमवेत त्याठिकाणी गेले. शवविच्छेदन केल्यानंतर रिंकूचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचे सांगण्यात आले. भरत यानेच रिंकूचा गळा दाबून खून केल्याची तक्रार रिंकूची आई चंदा मोहन ओसावाल यांनी शाहूपुरी पोलीस दिली.
पोलीस निरीक्षक पांढरे यांनी गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र सातारा जिल्हा न्यायालयात सादर केले. या खटल्यादरम्यान वैद्यकीय अधिकारी, मृत रिंकूची आई, काका यांच्यासह 11 जणांची साक्ष झाली. साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरुन न्यायाधीश डी.ए.ढोलकिया यांनी भरत ओसवाल याला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावला. सरकार पक्षातर्फे सुरुवातीला विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. विकास पाटील- शिरगावकर यांची नियुक्ती होती. त्यानंतर जिल्हा सरकारी वकील अॅड. महेश. कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रॉसीक्युशनचे उपनिरीक्षक पी.के. कबुले, हवालदार सुनील सावंत, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, कांचन बेंद्रे, नंदा झांजुर्णे, शाहूपुरीच्या पैरवी अधिकारी शशिकांत भोसले, रिहाना शेख यांनी मदत केली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |