06:15pm | Feb 13, 2020 |
सातारा : राजापुरी, ता. सातारा येथे अज्ञात इसमांनी वनक्षेत्रात लावलेला वनवा ठोसेघर येथील युवकांनी प्रसंगावधान दाखवत विझवल्याने शेकडो एकर दुर्मिळ वनौषधी बचावली.
याबाबत ठोसेघर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की ठोसेघर पठारावर वन विभागाची शेकडो एकर पडीक जमीन आहे. या जमिनीवर वन विभागाने नानाविध प्रकारची झाडांची रोपटी लावली आहेत. तसेच याच पठारावर विविध आजारांवर दुर्मिळ वनौषधी मोठ्या प्रमाणावर आहे. स्थानिक लोक रुग्णालयात जाण्याऐवजी या दुर्मिळ वनौषधींचा विविध आजारांवर उपचारासाठी वापर करतात. प्रतिवर्षी साधारण जानेवारी महिना संपल्यानंतर अज्ञात समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणावर वणवे लावण्याच्या घटना करतात. वणवे लावल्यामुळे शेत स्वच्छ होण्यासह पुढील पीक चांगले येते अशी एक अंधश्रद्धा येथील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
राजापुरी, ता. सातारा येथे वन विभागाच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. याठिकाणी मुबलक प्रमाणात वनौषधी पाहायला मिळतात. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांने वनविभागाच्या जमिनीला वनवा लागल्याची माहिती परळी वन विभागाचे वनरक्षक राज मुसलगे यांना समजली. त्यांनी तात्काळ ही बाब ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रवीण चव्हाण यांना दूरध्वनीवरून सांगितली पाण्यासह काही युवक घेऊन जात वणवा आटोक्यात आणण्याच्या सूचना त्यांनी दिल्यानंतर पाण्याचे प्लास्टिकचे बॅरल भरून प्रवीण चव्हाण, श्रीरंग चव्हाण, प्रवीण काकडे, विनायक चव्हाण, राम चव्हाण, नारायण सपकाळ, राज चव्हाण, कल्पेश लोहार, अरविंद लोहार, सुधीर कदम घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत वनरक्षक राज मुसलगे हे याठिकाणी दाखल झाले होते. सर्वांनी तात्काळ पाण्याच्या साह्याने वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र जोराचा वारा असल्याने वणवा भडकत असल्याचे निदर्शनास येताच दोन गट करून दोन तासाच्या अथक शर्तीनंतर झाडांच्या फाद्याच्या साह्याने वनवा पूर्णपणे आटोक्यात आणण्यास यश आले.
दुर्मिळ वनौषधी वाचवण्यात यश
दमा, हृदयविकार, शुगर यासह एखादी मोठी जखम झाल्यास त्या जखमेवर लावण्यासाठी या पठारावर मोठ्या प्रमाणावर वनौषधी आहे. स्थानिक लोक सर्रास या वनऔषधाचा वापर करत असतात. आज ठोसेघर येथील युवकांनी प्रसंगावधान दाखवत वणवा आटोक्यात आणल्यामुळे दुर्मिळ वनौषधी वाचविण्यात मोठ्या प्रमाणावर यश आल्याची प्रतिक्रिया राज मुसलगे यांनी दिली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |