01:16am | Oct 17, 2018 |
कराड : मी मुख्यमंत्री असताना कराडला प्रशासकीय इमारतीची मंजुरी दिली होती. तहसीलदार, प्रांताधिकारी व सर्व शासकीय कार्यालये या इमारतीत एकाच ठिकाणी येणार आहेत. अंतिम टप्प्यात असलेल्या या कामास गती देऊन जनतेची गैरसोय टाळावी, अशी सूचना राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केली.
आमदार चव्हाण यांनी कराडमधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व विश्रामगृहाच्या कामांची आज सायंकाळी पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. उत्तुरे, उपअभियंता बी. एन. पाटील, मानसिंग पाटील, नगरपालिकेचे अभियंता श्री. मुल्ला, ठेकेदार स्वप्निल शहा, शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, तलाठी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे, कुबेर देसाई, नितीन थोरात-सवादेकर, समीर पटवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, प्रशासकीय इमारतीचे 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु काम पूर्ण होण्यास अजूनही दोन महिने लागतील, असे दिसत आहे. या इमारतीमुळे लोकांची एका ठिकाणी सुविधा होणार आहे. त्याचबरोबर चांगली सुविधा निर्माण झाल्याने लोकांचा वेळदेखील वाचणार आहे.
ते म्हणाले, या इमारतीमध्ये वीजेचे भारनियमन झाल्यानंतर प्रशासकीय कामात व्यत्यय येऊ नये, याकरिता येथे सोलरद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करणार आहे. इमारतीचे बांधकाम व त्याअनुषंगाने कामे पूर्ण होत आली आहेत. इमारतीमधील फर्निचरसाठी टेंडर लवकर काढावे, जेणेकरून इमारत नसल्यामुळे लोकांची सुरु असलेली गैरसोय दूर होईल. एसटी बसस्थानकाचे मंत्री महोदयांशी बोलून लवकरच उदघाटन करण्याचा प्रयत्न राहील. कराडमध्ये तीन मोठी कामे व पाच इमारतींचे काम माझ्या कारकिर्दीत झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस वसाहत, बसस्थानक, प्रशासकीय इमारत व विश्रामगृह या मी मंजूर केल्या इमारतीची उत्कृष्ट काम झाले आहेत. त्याचबरोबर पाच इमारतींमुळे कराडचे वैभव खुलले आहे. अशा इमारती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |