02:01am | Mar 17, 2018 |
सातारा : सातार्यातील माची पेठेत शुक्रवारी दुपारी माची पेठेत सुसाट जेसीबीने समोरुन येणार्या व रस्त्यालगत पार्कींगमध्ये असणार्या 2 कार, 1 रिक्षा व 4 दुचाकींना चिरडले. खळबळ उडवून देणार्या या अपघातात दोन महिलांसह पाचजण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बे्रकफेल झाल्याने अपघात झाला असल्याचे जेसीबीचे म्हणणे आहे.
वैजंता डोईफोडे रा.गोविंदनगरी, कुंदन लोंढे रा.समर्थ मंदीर, सतीश मोरे रा.सातारा अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बोगद्याकडून जेसीबी क्रमांक एमएच 12 ईबी 1394 हा पोवई नाक्याच्या दिशेने निघाला होता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जेसीबी माची पेठेतील अदालत वाड्यासमोर आला. यावेळी पुढील बाजूस तीव्र उतारा होता. जेसीबी भरधाव वेगात असतानाच त्याचा अचानक ब्रेक फेल झाला. या घटनेने जेसीबी वाहन चालकाचे जेसीबीवरील नियंत्रण सुटले व समोरुन येणार्या वाहनांना ठोकरत सुटले. या अपघातात जेसीबीने रिक्षा क्रमांक एमएच 11 एम 8391, कार एमएच 11 एके 4905, कार एमएच 12 केई 3704 या वाहनांसह चार दुचाकींना ठोकर दिली होती. यातील बहुतेक वाहने समोरुन निघालेली होती.
जेसीबी समोरुन अंगावर येत असताना पाहून दुचाकीवरील युवकांनी प्रसंगावधान राखत त्यावरुन थेट उड्या मारल्या. रिक्षा चालकाला व त्यामधील महिला प्रवासीला बाहेर पडता आले नाही तर एका दुचाकीस्वार कारच्या पाठीमागे अडकून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. अवघ्या पाच मिनिटात परिसराचा नकाशाच बदलून गेला एवढा भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर जखमींना तत्काळ अडकलेल्या वाहनांमधून बाहेर काढून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमल्यानंतर जेसीबीवरील चालकाला शोधण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमाव त्याला मारहाण करणार एवढ्यात चालकाने अचानक बे्रक फेल झाल्याचे सांगितले. नागरिकांनी तत्काळ शाहूपुरी पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची परिस्थिती पाहिल्यानंतर पोलिसही हादरुन गेले. घटनास्थळाचा पंचनामा करुन रस्त्यावरील वाहतुक सुरळीत केली.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |