RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पन्नास हजारांची लाच स्विकारताना वकिलास अटक

15 May 2019 at 17:47

सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सातारा : ग्राहक न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याच्या अनुषंगाने न्यायालयातील न्यायाधीशांनी केसचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यासाठी पैसे मागितले आहेत, असे सांगून पक्षकाराकडून पन्नास हजारांची लाच स्विकारताना ऍड. शिवराज पाटील यांना सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांचा सातारा येथील ग्राहक न्यायालयात खटला सुरु आहे. ऍड. शिवराज मारुती पाटील (वय 30) मूळ रा. निगडी, ता. कराड हे तक्रारदार पक्षकाराचे वकील आहेत. ऍड. शिवराज पाटील यांनी तक्रारदाराला निकाल तुमच्या बाजूने लावायचा असेल तर न्यायालयाने सुमारे 1 लाख 70 हजार रुपये मागितले आहेत, असे सांगितले. परंतू तक्रारदाराला संशय आल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 26 एप्रिल रोजी याबाबत पडताळणी केली. या पडताळणीमध्ये संबंधित वकिलाने पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचेची रक्कम बुधवार दि. 15 मे रोजी घेण्याचे ठरले होते. त्यानुसार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळपासूनच सातारा येथील ग्राहक न्यायालयात सापळा रचला होता. लाचेची रक्कम ग्राहक न्यायालयाच्या बाहेरच स्विकारताना ऍड. शिवराज पाटील यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी संशयित वकिलावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमध्ये पोलीस उप अधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. आरिफा मुल्ला, पो. हवा. राजे, सपकाळ, ताटे, कर्णे यांनी सहभाग घेतला.


Vakilala badnam karnyasathi keleli takrar aahe, Vakil kadhi Lach ghet nasto fees gheto ani te fess kitipan ghevu shakto.


Vakilala badnam karnyasathi keleli takrar aahe, Vakil kadhi Lach ghet nasto fees gheto ani te fess kitipan ghevu shakto.


Vakilala badnam karnyasathi keleli takrar aahe, Vakil kadhi Lach ghet nasto fees gheto ani te fess kitipan ghevu shakto.


Vakilala badnam karnyasathi keleli takrar aahe, Vakil kadhi Lach ghet nasto fees gheto ani te fess kitipan ghevu shakto.


Vakilala badnam karnyasathi keleli takrar aahe, Vakil kadhi Lach ghet nasto fees gheto ani te fess kitipan ghevu shakto.

संतोष पोपटराव कांबळे

पन्नास हजाराची लाच कोणासाठी दिली होती वकिलाची फी होती गाणे कोणाला द्यायचे होते गुड काय आहे


वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे आरटीओ कार्यालयासमोरच वाहतुकीचे तीन तेरा

वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवणार्‍या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या बेकायदेशीर चारचाकी व दुचाकीच्या पार्किंगमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते सैनिक स्कूल मार्गावर आरटीओ अधिकारी आणि एजंटांच्या संगनमताने

26 minutes before

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

2 hours before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

14 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

14 hours before