03:11am | Sep 11, 2019 |
पाटण : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला असून धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर घटल्याने धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी बंद करण्यात आले. सध्या केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक्स ाणी पुर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत घट होवून विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे.
दरम्यान, अनंत चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर हे पाणी बंद करण्यात आल्याने यादिवशी विसर्जित होणारे घरगुती व गणेश मंडळांच्या मुर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यासाठीच्या नैसर्गिक अडचणी दूर झाल्या आहेत. यामुळे गणेशभक्त, मंडळांचे कार्यकर्ते व सभासद यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. परिणामी प्रशासनासह पोलीस यंत्रणाचाही ताण कमी झाला आहे. तर मुळगाव व नेरळे पुलावरील पाणी ओसरून दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.
कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर मंदावल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण त्याच पटीत घटले. सध्या धरणात सरासरी प्रतिसेकंद 22 हजार 162 क्युसेक्स पाणी येत आहे. धरणात सध्या 103.40 टीएमसी पाणीसाठा झाला असून ज्या पाण्याची आवक होत आहे त्याचा वीजनिर्मितीसाठी वापर, पुर्वेकडे पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सोडण्यात येणारे पाणी व अजून शिल्लक असलेली जवळपास दोन टीएमसी पाणी साठवण क्षमता याचा विचार लक्षात घेता सोमवारी रात्री धरणाचे सहा वक्री दरवाजे आधी चार फूटावरून तीन फूट करण्यात आले होते. मंगळवारी पुन्हा येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिकच कमी झाल्याने सकाळी हे दरवाजे दोन फूट करण्यात आले. तर दुपारी बारानंतर हे दरवाजे पुर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळे आता धरणातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी पुर्णपणे बंद झाले आहे. केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक्स इतकेच पाणी पुर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 98.40 टीएमसी व पाण्याची उंची 2162 फूट 1 इंच इतकी झाली आहे.
मंगळवार दि. 10 रोजी सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 26 (6659), नवजा 41 (7708) तर महाबळेश्वर येथे 17 (6696) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिपर्जन्यवृष्टी पडणाऱ्या क्षेत्रातील प्रतापगड येथे 14 (6245), सोनाट 10 (5541), वळवण 8 (7407), बामणोली 2 (4486) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |