सातारा : जकातवाडी (ता.सातारा) गावच्या हद्दीतून दुचाकीस अडकवलेली दोन लाखांची रोकड असणारी पिशवी गुरुवारी दुपारी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी चोरुन नेली. याबाबतची तक्रार भारतीय सैन्य दलात कार्यरत असणार्या विजय संपत देशमुख (रा.कारी, ता.सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
जवान विजय देशमुख हे भारतीय सैन्यात कार्यरत असून सध्या त्यांची नेमणूक बिकानेर येथे आहे. गावी घर बांधायचे असल्याने त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियातून 3 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर देशमुख हे पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. दि. 1 रोजी त्यांना कुटुंबियांनी फोन करुन काम सुरु करायचे असल्याने गावी येण्यास सांगितले. त्यानुसार ते गावी परतले. दि. 3 रोजी बांधकामासाठीचे साहित्य खरेदी करायचे असल्याने आवश्यक पैसे काढण्यासाठी ते दुचाकीवरुन सातार्यातील बँकेत आले. दोन लाखांची रोकड काढल्यानंतर देशमुख हे पुन्हा कारीकडे निघाले.
जकातवाडीच्या हद्दीत आल्यानंतर दुचाकी थांबवून ते लघुशंका करण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी दोन लाखांची रोकड असणारी पिशवी दुचाकीच्या हँडलला अडकवली होती. याच दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी दुचाकीच्या हँडलला असणारी पिशवी ओढून पळ काढण्यास सुरुवात केली. यानंतर देशमुख यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते सापडले नाहीत. गुरुवारी रात्री देशमुख यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द तक्रार दिली असून तक्रारीत चोरट्यांनी दोन लाखांची रोकड, बँक पुस्तक, ओळखपत्र असणारी पिशवी चोरुन नेल्याचे म्हटले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |