01:07pm | Nov 16, 2018 |
कराड : फ्लॅट फोडून चोरट्यांनी आठ तोळे दागिन्यांसह दोन लॅपटॉप लंपास केल्याची घटना मलकापूर (ता. कराड) येथील आनंद विहार अपार्टमेंटमध्ये गुरूवारी दुपारी घडली. तसेच चोरी केल्यानंतर चोरटे फ्लॅट मालकाचीच दुचाकी घेऊन पसार झाले. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कैद झाले असून त्या फुटेजवरून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश ज्ञानेश्वर कुदळे हे कराड अर्बन बँके नोकरी करतात. गुरूवारी ते बँकेत गेले होते, तर त्यांच्या पत्नी घरी होत्या. दुपारी घरातील साहित्य आणण्यासाठी त्या बझारमध्ये गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी आनंद विहार अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून बनावट चावीने कुदळे यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडला. बेडरूममधील लाकडी कपाटाचे दरवाजे उघडून कपाटातील सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लॅपटॉप लांबविले. चोरी केल्यानंतर तेथेच दुचाकीची चावी पडलेली दिसली. चोरट्यांनी ती चावी घेऊन अपार्टमेंटच्या पार्किंगमधील फ्लॅट मालकाचीच दुचाकी घेऊन पलायन केले. लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवरून चोरटे हातात काठी घेऊन आले होते. त्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्या आहेत. त्यावरून संशयितांचा शोध सुरू आहे. पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वप्नील लोखंडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सुत्रे हलवली. मलकापूर परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. रात्री उशीरा ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |