11:22pm | Mar 31, 2018 |
सातारा : सातारा शहरातील वाहतुकीचे नियमन करीत असताना वाहतुक पोलीसांना अनेक चांगल्या तसेच कटु प्रसंगाना सामोरे जावे लागते. पोलीस प्रामाणिकपणे आपले दैनंदिन काम करीत असतात. काही जागरुक नागरिक पोलीस कर्मचाऱ्यां कडुन मिळालेल्या सहकार्याबद्दल तसेच प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपले मत नोंदवित असतात व कौतुक देखील करीत असतात.
काही दिवसापूर्वी सौ.अरुणा कृष्णत माने या जिल्हा परिषद चौक येथून त्यांच्या चारचाकी गाडीतुन प्रवास करीत असताना त्यांचेकडून सिग्नल संबंधिच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांना वाहतुक पो. हे. कॉ. अनिल धनवडे ब. नं. 861 व चा. पो. ना. विजय माळी यांनी थांबवून त्यांची चुक लक्षात आणून त्यांना 200 रु. दंड भरण्यास सांगितले. सौ. माने यांनी आपली चुक कबुल करुन दंडाची रक्कम म्हणून रु. 500/- जमा करुन पावती घेऊन उर्वरित रक्कम परत न घेताच घाईगडबडीत निघुन गेल्या. बऱ्याच वेळाने त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी परत जिल्हा परिषद चौकात येताच श्री. धनवडे व माळी यांनी त्यांना तुम्ही पैसे परत न घेताच निघुन गेला हे तुमचे राहिलेले पैसे म्हणून सौ. माने यांना उर्वरित रु. 300/- इतकी रक्कम लगेच परत केली. पोलीसांच्या या प्रामाणिकपणा बद्दल सौ. माने यांनी पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांना पत्र लिहुन कळविले.
पो. हे. कॉ. अनिल धनवडे व चा. पो. ना. विजय माळी यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन व जनमानसातील प्रतिमा उंचावण्याचे काम केल्याबद्दल पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी त्यांचे बक्षिस देवून कौतुक केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |