सायगाव : लग्नकार्यात बक्षीस स्वरूपात मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून वाढप्याचा कुऱ्हाड व कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना जावळी तालुक्यातील सोनगाव येथे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
राहूल मेंगळे (वय ३५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. मोहन सुखदेव मेंगळे, अनिल मोहन मेंगळे, विशाल मोहन मेंगळे, सनी मोहन मेंगळे व नंदा मोहन मेंगळ (रा. सोनगाव, ता. जावळी) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत मेढा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यात सर्व आरोपी व मयत व्यक्तीचा भाऊ विश्वनाथ मेंगळे हे वाढपी म्हणून गेले होते. यावेळी त्यांना एक हजार रुपये बक्षीस स्वरूपात
देण्यात आले होते. हे पैसे कोणालाच द्यायचे नाही यावरून मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास विश्वनाथ मेंगळे व त्याचा भाऊ राहूल मेंगळे यांना या सर्वांनी धक्काबुक्की करत मारहाण केली.
हा वाद विकोपाला गेल्याने सनी मेंगळे याने विश्वनाथ मेंगळे यांच्या डोक्यात खोरे मारून त्यांना जखमी केले. यानंतर अनिल मेंगळे याने राहूल मेंगळे याच्यावर कुऱ्हाड व कोेयत्याने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन पाचही आरोपींना अटक केली. यापैकी तीघे शिवारात तर दोघे घरातील माळ्यावर लपून बसले होते. विश्वनाथ मेंगळे यांनी
पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने तपास करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |